scorecardresearch

आयएएस नियमांवरून ममतांचे मोदींना पत्र

दुरुस्तीमुळे संघराज्याची संरचना आणि संविधानाची मूलभूत रचना ‘नष्ट’ होईल, असे गेल्या आठ दिवसांत या मुद्द्यावर मोदी यांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात ममता यांनी नमूद केले आहे.

कोलकाता : आयएएस नियमावली १९५४ मधील प्रस्तावित दुरुस्तीविरुद्ध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या दुरुस्ती जाचक असून त्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होईल आणि त्यांच्या कामगिरीवर परिणाम होईल, असे ममता यांनी म्हटले आहे. या दुरुस्तीमुळे संघराज्याची संरचना आणि संविधानाची मूलभूत रचना ‘नष्ट’ होईल, असे गेल्या आठ दिवसांत या मुद्द्यावर मोदी यांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात ममता यांनी नमूद केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ias regulations west bengal chief minister mamata banerjee opposes the amendment letter to prime minister narendra modi akp

ताज्या बातम्या