ICSE दहावीचा ९९.९८ टक्के; तर ISC बारावीचा ९९.७६ टक्के निकाल

आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल ९९.९८ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.७६ टक्के इतका लागला आहे.

ICSE
ICSE दहावीचा ९९.९८ टक्के; तर ISC बारावीचा ९९.७६ टक्के निकाल (प्रातिनिधीक फोटो/ Photo- Indian Express)

आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल ९९.९८ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.७६ टक्के इतका लागला आहे. यंदा करोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीचा निकाल नववीचे गुण आणि दहावीच्या अंतर्गत गुणांच्या मुल्यांकनावर लावण्यात आला आहे. तर बारावीचा निकाल ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षेतील गुणांवर आधारित आहे.

ICSE दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख १९ हजार ४९९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख १८ हजार ८४६ मुलं, तर १ लाख ६५३ मुली होत्या.दुसरीकडे ISC बारावीच्या परीक्षेसाठी ९४ हजार ११ विद्यार्थी बसले होते. त्यापाकी ५० हजार ४५९ मुलं, तर ४३ हजार ५५२ मुली होत्या. महाराष्ट्रात आयसीएसईच्या २३४ शाळा आहेत. या शाळेतील २४ हजार ३५९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. तर आयएसीच्या एकूण ५३ उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळेतून ३ हजार ४२७ मुलं परीक्षेला बसली होती. त्यापैकी ९९.९४ टक्के मुलं पास झाली आहेत.

निकाल कुठे आणि कसा पाहाल
१) www.cisce.org आणि www.results.cisce.org या दोन संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. होम पेजवर ‘Results 2021’ यावर टॅप केल्यानंतर ICSE/ISC Year 2021 असे दोन पर्याय दिसतील. त्यानुसार त्यावर क्लिक करा. परीक्षार्थीला त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स क्रमांक आणि स्क्रिनवर आलेला कॅपचा कोड टाकावा लागेल. त्यानंतर निकाल दिसेल. त्यानंतर त्याखाली डाउनलोडचा पर्याय असेल तिथून निकाल डाउनलोड करता येईल.

२) एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. परीक्षार्थीला निकालासाठी त्याचा युनिक आयडी टाकून ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तात्काळ रिझल्ट दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Icse class 10 and isc class 12 board exam result declare rmt

ताज्या बातम्या