गुरू ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथाची विटंबना करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची मागणी करणारे भादंविमध्ये (पंजाब सुधारणा) विधेयक २०१६ सोमवारी पंजाब विधानसभेत मंजूर करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते चरणजितसिंग चन्नी यांनी, याच प्रकारची शिक्षा दुसऱ्या धर्माचा अनादर केल्यासही प्रस्तावित करावी, अशी मागणी केली. विधेयक सभागृहात मांडण्यात येत असताना चन्नी काँग्रेसच्या सदस्यांसमवेत सभागृहाबाहेर गेले. सभागृहात परतल्यावर चन्नी यांनी, काँग्रेसचे तरलोचन सूंध यांनी प्रस्तावित केलेली सुधारणाही स्वीकारण्याची विनंती केली. अन्य धर्माबद्दल अनादर केल्यास त्यासाठीही जन्मठेपेची शिक्षा ठोठवावी, असे त्यांनी प्रस्तावित केले. ही सुधारणा फेटाळण्यात आली. एखाद्या मंदिरात मूर्ती बसविण्यात आली की तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते, गीता आणि कुराण याप्रमाणे अन्य धर्मीयांनाही त्यांचे ग्रंथ आदरयुक्त आहेत. ही आपली सूचना आहे त्याचा स्वीकार करावयाचा की नाही हे सभागृहाने ठरवावे, असे चन्नई म्हणाले.