बंगळूरु : कर्नाटकातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी दिली.

या आठवडय़ाच्या आरंभी प्रवीण नेत्तारु या भाजयुमो कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. यासंबंधात शुक्रवारी आणखी एकास अटक करण्यात आली. हे प्रकरण आंतरराज्यीय असल्याने (कर्नाटक- केरळ) एनआयएकडे सोपविले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

दरम्यान, हा हत्येमुळे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांत संतापाची भावना असून बोम्मई सरकार आपल्याच कार्यकर्त्यांचे संरक्षण करू शकत नाही, अशी टीका भाजप आणि संघ परिवारातून सुरू आहे. कर्नाटकातही उत्तर प्रदेशप्रमाणे योगी मॉडेल राबविण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याबाबत गुरुवारी मुख्यमंत्री बोम्मई यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, गरज भासली तर आम्ही कर्नाटकातही योगी मॉडेलच्या धर्तीवर कारवाई करण्यास तयार आहोत. ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये जी स्थिती आहे, त्यासाठी योगी हे सुयोग्य मुख्यमंत्री आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकमधील स्थिती हाताळण्यासाठीही वेगवेगळे मार्ग आहेत आणि ते अवलंबिले जात आहेत. जर गरज भासली, तर योगी मॉडेलप्रमाणे कर्नाटकातही सरकार राबविले जाईल.  दहशतवादविरोधी पथक आणि अंतर्गत सुरक्षितता विभाग (आयएसडी) यांच्याव्यतिरिक्त विशेष कमांडो युनिट उभारले जाईल.