“राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पानांवरुन पीक कोणतं हे ओळखल्यास राजकारण सोडेन”

कांदा कसा उगवतो याची राहुल गांधींना माहिती नसेल – शिवराजसिंह चौहान

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी निशाणा साधला आहे. या देघांनी जर एखाद्या पिकाच्या पनावरुन ते पीक कोणतं आहे हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन असं आव्हान त्यांनी दिलं आहे. गांधी परिवाराकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शेखावत म्हणाले, “राहुल आणि प्रियंका गांधी यांना शेळ्यामेंढ्यामधला फरक कळणार नाही. तसेच जर या बहिणभावाने शेतातील पीकाच्या पानांवरुन ते कशाच पीक आहे हे ओळखल्यास आपण राजकारण सोडून देऊ.”

कांदा कसा उगवतो याची राहुल गांधींना माहिती नसेल – शिवराजसिंह चौहान

शेतकरी कायद्यांविरोधात राहुल गांधी यांनी पंजाब, हरयाणामध्ये काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीविरोधात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की, “राहुल गांधी यांना एकवेळ मिरचीचं रोप असतं हे ठाऊक असेल पण कांदा जमिनीखाली उगवतो की जमीनीच्यावर हे त्यांना माहिती नसेल”

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं गेल्या महिन्यांत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायद्यात रुपांतर झाले. मात्र, हे कायदे शेतकरी विरोधी कायदे असल्याचे विरोधक, शेतकरी संघटना यांचे म्हणणे आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: If rahul gandhi priyanka can identify a crop by its leaves i would leave politics says gajendra singh shekhawat aau

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या