करोनाच्या दुसऱ्या लाटेत जर मोदी सरकारने वेळीच योग्य ती पावलं उचलली असती तर देशात १३ कोटी रुग्णांना करोनापासून वाचवता आले असते आणि १ लाख मृत्यू टाळता आले असते असे मत मिशिगन विद्यापीठातील महामारी विज्ञान आणि जागतिक सार्वजनिक आरोग्य या विषयांच्या प्राध्यापिका भ्रमर मुखर्जी यांनी मांडले आहे. भ्रमर मुखर्जी यांनी मिशिगन विद्यापीठात भारताच्या करोना परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे. प्राध्यापिका मुखर्जी यांनी त्यांच्या अलिकडील अहवालात भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट आणि निर्बंधामध्ये हस्तक्षेप करण्यास विलंब यांनी संभाव्य भूमिका बजावली असे म्हटले आहे.

भारतातील दुसर्‍या लाटेच्या वेळी झालेल्या विध्वंससाठी मोदी सरकार प्रामुख्याने जबाबदार होते असे त्यांनी म्हटलेलं म्हणणार नाही, पण दोन किंवा तीन वेळा झालेल्या चुकांसाठी आम्ही सरकारला जबाबदारी आणि दोषातून मुक्त करू शकत नाही असे मुखर्जी यांनी मान्य केले आहे.

द वायरला दिलेल्या मुलाखतीत मुखर्जी त्यांनी दुसर्‍या लाटेवरील त्यांच्या अलीकडील अभ्यासामधील आश्चर्यकारक पण त्रासदायक आणि निराश करणारा निष्कर्ष सांगितला. त्या म्हणाल्या, “जर सरकारने मार्चअखेर किंवा उत्तरार्धात लॉकडाऊन जाहीर केला असता तर दररोजच्या रुग्णांमध्ये ४,१४,००० एवढी वाढ होता अनुक्रमे ही संख्या २०,००० आणि ४९,००० वर असती. १५ एप्रिलपर्यंत अंदाजे २.६ दशलक्ष प्रकरणे टाळता आली असती आणि १५ मे पर्यंत जवळपास १२.९ दशलक्ष प्रकरणे टळली जाऊ शकता आली असती.”

करोना मृत्यूंविषयी बोलताना त्या म्हणाल्या मार्चच्या मध्यापासून किंवा शेवटी लॉकडाऊन लावला असता तर  ९७,००० ते १०९,००० पर्यंत मृत्यू १५ मे पर्यंत टाळता आले असते. १५ मार्च ते १५ मे दरम्यान १,१२,००० मृत्यू झाले होते जे ९० ते ९८ टक्के होते. त्यांनी आपल्या अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे, “थोडक्यात सांगायचे झाले तर मार्चमध्ये कोणत्याही वेळी कारवाई झाली असती तर,  निश्चित १ मार्च ते १५ मे दरम्यान झालेल्या ९० टक्के पेक्षा जास्त घटना आणि मृत्यू होण्याची शक्यता टाळता आली असती.”

करोना विषाणू साथीची दुसरी लाट अद्याप संपलेली नसल्याने केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे लसीकरणावर भर देणे आणि नियम-निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला होता.

देशभरात सलग काही दिवस करोनाचा सरासरी संसर्गदर कमी आहे. दैनंदिन रुग्णवाढीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पण काही राज्यांमध्ये अजूनही संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यांतील परिस्थिती आटोक्यात असली तरी, केरळ, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओदिशा आणि मणिपूर या सहा छोटय़ा राज्यांमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. करोना साथीची दुसरी लाट सरली नसल्याने राज्यांना दक्षता घ्यावी लागेल, अशी सूचना केंद्र सरकारतर्फे देण्यात आली आहे.