माहिती अधिकार कायद्याचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ त्या विषयात प्रमाणपत्र व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे. केंद्रीय माहिती आयुक्तालयाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम तयार करून ते राबवले जाणार आहेत. सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे राहील. यासाठी कैद्यांनाही प्रवेश खुला आहे. पत्रकारही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील.

विद्यापीठाचे कुलगुरू नागेश्वर राव यांनी म्हणाले, अनेकांना माहिती अधिकारातील तांत्रिक गोष्टी माहिती नाहीत. माहिती अधिकारात प्रश्न विचारताना तो कसा विचारावा, त्यात अपील कुठे करावे, आणखी माहिती कशी मिळवावी यावर आधारित असे हे अभ्यासक्रम असतील. प्रमाणपत्र अभ्यासक्रम जुलै २०१६ मध्ये सुरू होत आहे, तर पदविका अभ्यासक्रम २०१७ मध्ये सुरू होत आहे. दरवर्षी प्रवेशाची दोन सत्रे होतील.