एअर इंडियाचे नवे सीईओ आणि एमडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा समूहाने इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे नवीन CEO आणि MD म्हणून नियुक्ती केली आहे. टाटा सन्सच्या पत्रात असे म्हटले आहे की बोर्डाने इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यास योग्य विचारविमर्शानंतर मान्यता दिली आहे.

एअर इंडिया बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इल्कर आयसी यांना विमान कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. ते तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्षही राहिले आहेत.एअर इंडियाचे नवीन CEO म्हणून नियुक्त झालेले इल्कर आयसी यांना विमान कंपन्यांमध्ये मोठ्या जबाबदारीसह नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. ते ५१ वर्षांचे असून त्यांनी तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष म्हणून काम करताना मोठी भूमिका बजावली आहे. आयसी हे तुर्कीतील बिल्केंट विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासन विभागाचे १९९४ च्या बॅचचे विद्यार्थी होते.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

बोर्डाच्या म्हणण्यानुसार, आता इल्कर आयसींचे नाव मंजुरीसाठी नियामक मंडळाकडे पाठवले जाईल. बोर्डाच्या बैठकीत उपस्थित असलेले टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी आयसींच्या नियुक्तीबद्दल सांगितले की, इल्कर हे हवाई वाहतूक उद्योगाचे नेते आहेत ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात तुर्की एअरलाइन्सचे नेतृत्व केले. इल्कर यांचे टाटा समूहात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, जिथे ते एअर इंडियाला नवीन उंचीवर नेतील, असेही ते म्हणाले.

एअर इंडियाचे CEO आणि MD म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, आयसी म्हणाले की, प्रतिष्ठित एअरलाइन्सपैकी एकाशी निगडीत असल्याचा मला अत्यंत सन्मान वाटतो. टाटा समूहाचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. टाटा समूहाचे नेतृत्व आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत मी मन लावून काम करेन. आम्ही आमचा अनुभव आणि एअर इंडियाचा मजबूत वारसा वापरून जगातील सर्वोत्तम विमानसेवा तयार करू. नवीन सीईओ इल्कर आयसी १ एप्रिल २०२२ पासून एअर इंडियामध्ये आपली जबाबदारी स्वीकारतील.