राजकारण्यांवर हल्ल्याचा प्रयत्नात होती इंडियन मुजाहिदीन

छत्तीसगढमधील दरभामध्ये नक्षलवाद्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा इंडियन मुजाहिदीनवर मोठा प्रभाव पडला होता.

छत्तीसगढमधील दरभामध्ये नक्षलवाद्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा इंडियन मुजाहिदीनवर मोठा प्रभाव पडला होता. त्याच पद्धतीने इतर ठिकाणी राजकारण्यांवर हल्ला करण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात इंडियन मुजाहिदीन होती, अशी माहिती गेल्या महिन्यात पकडलेला कुख्यात दहशतवादी यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांनी दिलीये.
‘त्या’ स्फोटाचा बदला घेण्यासाठीच भटकळने केले हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट
एनआयएच्या अधिकाऱयांनी भटकळ आणि अख्तरकडे केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला असून, सर्व राजकारण्यांची सुरक्षितता वाढविण्याचेही आदेश दिले आहेत.
सर्वसामान्यांवर हल्ला करून त्याचा देशातील सरकारवर फारसा परिणाम होत नाही. मृतांच्या नातेवाईकांना किंवा जखमींना आर्थिक मदतीचे वाटप करून सरकार शांतता निर्माण करण्याचे काम करते. जर सरकारला खरोखरच धक्का द्यायचा असेल, तर राजकाऱण्यांनाच लक्ष्य केले पाहिजे, असे इंडियन मुजाहिदीनच्या नेतृत्त्वाला वाटत असल्याचे भटकळ आणि अख्तर यांनी एनआयएला सागितल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मुजाहिदीनचा दहशतवादी न्यायालयातून फरार
राजकाऱण्यांवर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रे आणि स्फोटके मिळवण्यासाठी इंडियन मुजाहिदीन नक्षलवाद्यांची काही मदत मिळते का, याचीही चाचपणी करीत असल्याचे समोर आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Im planning chhatisgarh like attack on politicians reveals bhatkal