इंडियन मेडिकल असोसिशनने केरळ सरकारविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा दिलाय. ‘बकरी ईद’च्या कालावधीमध्ये करोनाची परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने नियमांमध्ये सूट दिल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते असं आयएमएचं म्हणणं आहे. देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असणाऱ्या आयएमएनं केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक असतानाही सरकारने दिलेली निर्बंधांमधील सूट चिंताजनक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ही सूट दिल्याने राज्यात करोनाचं संकट अधिक गडद होण्याची चिन्ह असल्याचे संकेत एमआयएनं दिले आहेत.

“राज्यामध्ये करोना बाधितांची संख्या वाटत असतानाच केरळ सरकारने लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट दिली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही सूट देण्यात आल्याचं पाहून एमआयएला चिंता वाटत आहे. वैद्यकीय आत्पकालामध्ये अशाप्रकारची सूट देणं हे अयोग्य आणि अनावश्यक आहे,” असं आयएमएनं रविवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या पत्रकामध्ये आयएएमने केरळ सरकारचा निर्णय हा दुर्देवी असल्याचं म्हटलं असून यामुळे मोठ्याप्रमाणामध्ये लोक एकत्र येतील अशी भीतीही व्यक्त केलीय.

“देशाचं आणि मानवतेचं भलं व्हावं या मताने तसेच जबाबदारीचं भान राहून आयएमएकडून केरळ सरकारला विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले आदेश मागे घ्यावेत. तसेच त्यांनी कोव्हिड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेव्हियर (करोना नियमांसंदर्भातील अंमलबजावणी) न कणाऱ्यांविरोधात झिरो टॉलरन्स (दया, माया न दाखवता कारवाई) धोरण स्वीकारावे. केरळ सरकारने राज्य आणि पर्यायाने देश सुरक्षित ठेवण्याच्या आपल्या उद्दीष्टांपासून विचलीत होऊ नये,” असं आयएमएने आपल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच “केरळ सरकारने नियर्ण रद्द करत कोव्हिड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेव्हियरचं पालन करण्याला चलना दिली नाही आणि करोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासंदर्भातील उपाय केले नाहीत तर,” सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शुक्रवारी करोनासंदर्भातील नवीन नियमांची घोषणा केली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरच नवीन नियमांची घोषणा करण्यात आलीय. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ट्रील लॉकडाउनच्या परिसरातील दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आलीय. बकरी ईदनिमित्त जास्तीत जास्त ४० जणांना एका जागी जमण्यास परवानगी देण्यात आलीय. मात्र या ४० जणांनी लसीचा किमान एक डोस घेणं बंधनकारक आहे. केरळ सरकारने १८,१९,२० तारखेची सूट वगळता विकेण्ड लॉकडाउन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय. २० तारखेला बकरी ईद आहे. या नवीन नियमांमुळे वाद निर्माण झाला असून अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असतानाच त्यामध्ये आता इंडियन मेडिकल असोसिशनची भर पडलीय.