एपी, सेऊल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात ‘नॅशनल असेंब्ली’मध्ये मांडण्यात आलेल्या महाभियोगाचा ठराव शनिवारी नामंजूर झाला. यून येओल यांच्या पीपल्स पार्टी या पक्षाच्या बहुसंख्य सदस्यांनी महाभियोग प्रस्तावाच्या मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे ते या नामुष्कीतून वाचले. येओल यांनी मंगळवारी अचानक आणीबाणी जाहीर केल्यामुळे त्यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव मांडण्यात आला होता.
महाभियोगाचा ठराव मंजूर होण्यासाठी यून यांच्याविरोधात ‘नॅशनल असेंब्ली’च्या दोन तृतियांश किंवा ३००पैकी २०० सदस्यांची मते पडणे आवश्यक होते. प्रत्यक्षात ठरावाच्या बाजूने १९२ मते पडली. पीपल्स पार्टीचे बहुसंख्य सदस्य गैरहजर राहिल्यामुळे आवश्यक २००पेक्षा आठ मते कमी पडली आणि महाभियोगाचा ठराव फेटाळला गेला. हा निकाल अतिशय खेदजनक असल्याची प्रतिक्रिया ‘नॅशनल असेंब्ली’चे स्पीकर वू वॉन शिक यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>Narayana Murthy : नारायण मूर्तींनी बंगळुरुमध्ये विकत घेतलं ‘इतक्या’ कोटींचं आलिशान घर, विजय मल्ल्याशी कनेक्शन काय?
महाभियोगाचा ठराव अयशस्वी झाल्यानंतर यून येओल यांच्याविरोधातील नागरिकांची निदर्शने अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियातील बहुसंख्य जनता अध्यक्षांनी पद सोडावे या मतावर ठाम असल्याचे एका सर्वेक्षणाच्या पाहणीत आढळले आहे. यून यांच्या आणीबाणी लादण्याच्या प्रयत्नांना विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीसह त्यांच्या पीपल्स पार्टीनेही विरोध दर्शवला होता. मात्र, महाभियोगामुळे अध्यक्षपद विरोधी पक्षाकडे जाण्याची त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते त्यांच्या पाठिशी उभे राहिले.