इम्रान खान यांना करोनाची लागण

पंतप्रधानांना खोकल्याचा त्रास होत असून अंगात सौम्य ताप आहे, असे डॉ. शाहबाज गिल म्हणाले.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना करोनाची लागण झाली असून शनिवारपासून ते निवासस्थानी स्वयंविलगीकरणात गेले आहेत, असे त्यांचे आरोग्यविषयक प्रमुख सल्लागार डॉ. फैझल सुलतान यांनी सांगितले. इम्रान खान यांनी दोनच दिवसांपूर्वी लशीची पहिली मात्रा घेतली होती. इम्रान यांना करोनाची लागण झाली असल्याचे डॉ. सुलतान यांनी ट्वीट केले. पंतप्रधानांना खोकल्याचा त्रास होत असून अंगात सौम्य ताप आहे, असे डॉ. शाहबाज गिल म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Imran khan corona virus infection corona positive disease akp

ताज्या बातम्या