पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे मागील नऊ महिन्यांत पहिल्यांदाच अदियाला तुरुंगाबाहेर पत्नीला आणि बहिणीला भेटले. २०२३ पासून इम्रान खान तुरुंगात आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१८ ऑगस्ट) त्यांची प्रकृती बिघडली आहे त्यांना रुग्णालयात दाखल करा असे आदेश दिले. ज्यानंतर इम्रान खान हे त्यांच्या पत्नीला आणि बहिणीला भेटू शकले आहेत. इम्रान खान हे पाकिस्तान क्रिकेट संघाचे कप्तान होते. त्यानंतर ते राजकारणात आले. भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणांमध्ये इम्रान खान यांना १४ वर्षांची शिक्षा झाली आहे.
१५ मिनिटांसाठी बहिणीला भेटले इम्रान खान
‘डॉन’च्या वृत्तानुसार इम्रान खान हे त्यांची बहीण नूरिन नियाजी यांना १५ मिनिटांसाठी भेटले. तुरुंगाच्या प्रेस कॉन्फरन्स रुममध्ये इम्रान खान यांची भेट बहिणीशी झाली. यावेळी या दोघींनी इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. तसंच नूरिन यांनी हे सांगितलं की त्यांनी इम्रान खान यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिले आहेत ते सांगितलं. यानंतर इम्रान खान यांना तपासणीसाठी इंटरनॅशनल रुग्णालयात घेऊन जा असे निर्देश तुरुंग प्रशासनाने दिले. मागील ९ महिन्यांत इम्रान खान हे पहिल्यांदाच बहिणीला भेटू शकले आहेत. इम्रान खान आणि त्यांच्या बहिणीच्या भेटीचे तपशील समोर आलेले नाहीत. तसंच त्यांच्या पत्नीची आणि त्यांची भेट मंगळवारी तुरुंगाच्या प्रेस कॉन्फरन्स रुममध्ये पार पडली.
भेटीबाबत तपशील समोर आले नाहीत कारण…
इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या तसंच बहिणीच्या भेटीचे तपशील समोर आलेले नाहीत. कारण सर्वोच्च न्यायालयाने याबाबत हे सांगितलं होतं की भेटीचा उपयोग जर राजकीय फायद्यासाठी केला गेला तर आम्ही इम्रान खान यांना दिलेली सूट काढून घेऊ. तसंच इम्रान खान यांच्या इतर बहिणी अलीमा खान, उज्मा खान आणि चुलत भाऊ कासिम जमान यांनी इम्रान खान यांना भेटू नये असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे अवघ्या १५ मिनिटांत ही भेट पार पडली. इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनाही त्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती.
बुशरा बीबी यांची मंगळवारी भेट
इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशला बीबी यांची मंगळवारी भेट झाली. ही या दोघांमध्ये साधारण ३० ते ३५ मिनिटं चर्चा झाली. मंगळवारी तुरुंगाच्या प्रेस कॉन्फरन्स रुममध्ये ही भेट झाल. अदियाला तुरुंगात बुशरा बीबी यांनाही ठेवण्यात आलं आहे. त्यांनी कुटुंबाच्या इतर सदस्यांची भेटही यावेळी घेतली असंही वृत्त डॉन आणि एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलं आहे.
