पीटीआय, इस्लामाबाद : पाकिस्तान सरकार माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षावर बंदी घालण्याचा विचार करत आहे अशी माहिती पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी दिली. इम्रान यांच्या अटकेनंतर पीटीआय समर्थकांनी रावळपिडींमध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केल्यामुळे पक्षावरील बंदीची शक्यता तपासली जात असल्याचे ख्वाजा आसिफ यांनी सांगितले.

इम्रान यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून पाकिस्तान रेंजर्सने अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी हिंसक निदर्शने केली होती. निदर्शकांनी रावळिपडीमधील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला करून तिथे तोडफोड व नासधूस केली होती. तसेच लष्कराच्या डझनभर आस्थापनांची नासधूस केली होती. त्यामध्ये लाहोरमधील कॉर्प्स कमांडर अधिकाऱ्याच्या घराची जाळपोळ, मियाँवली हवाई तळ आणि फैसलाबादमधील आयएसआयच्या इमारतीवरील हल्ल्याचा समाऐश आहे. पाकिस्तानच्या इतिहासात सामान्य नागरिकांनी लष्कराच्या मुख्यालयात घुसखोरी करण्याचा हा पहिलाच प्रकार होता. त्यानंतर एक हजारांपेक्षा जास्त जणांवर खटला दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालवला जाईल असा ठराव कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजे नॅशनल असेम्ब्लीमध्ये मंजूर करण्यात आला आहे.

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
aap protests on delhi road against arvind kejriwal s arrest
‘आप’ विरुद्ध भाजप; केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ‘आप’ची निदर्शने, भाजपकडून राजीनाम्याची मागणी

इम्रान खान यांनी अद्याप या हल्ल्यांचा निषेधही केलेला नाही असे आसिफ पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पीटीआयवरील बंदीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही पण त्याचा आढावा नक्कीच घेतला जात आहे असे ते म्हणाले. मात्र, सरकारने पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाच तर मंजुरीसाठी संबंधित प्रस्ताव कायदेमंडळाकडे पाठवला जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र, राजकीय पक्षावर अशी बंदी घालता येत नाही असा दावा पीटीआयचे नेते बॅरिस्टर अली जफर यांनी सांगितले, पक्षातर्फे अशा बंदीला न्यायालयात आव्हान दिले जाईल असे ते म्हणाले.

इम्रान यांच्या निकटवर्तीयाचा राजीनामा

पाकिस्तानचे माजी माहिती मंत्री आणि इम्रान खान यांचे निकटवर्तीय फवाद चौधरी यांनी बुधवारी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचा राजीनामा दिला. आपण पक्षाचा राजीनामा देत असून इम्रान यांच्यापासून दूर होत आहोत असे ट्विट त्यांनी केले. चौधरी यांच्या राजीनाम्यामुळे इम्रान यांना मोठा धक्का बसला आहे. पीटीआयच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे सरकारने पक्षावरील दबाव वाढवला आहे. त्यामुळेच एकापाठोपाठ एक महत्त्वाचे नेते राजीनामा देत असल्याचे दिसत आहे.