तालिबानचं समर्थन करणाऱ्या इम्रान खान यांचा यू-टर्न; बायडेन यांच्या निर्णयाचं कौतुक करत म्हणाले, …

पाकिस्तानने अफगाणिस्तानातला गोंधळ आवरावा अशी अपेक्षा अमेरिकेने बोलून दाखवल्याच्या एका महिन्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी बायडेन यांचं कौतुक केलं आहे.

तालिबानने अफगाणिस्तानात आपलं वर्चस्व निर्माण केल्यानंतर वारंवार तालिबानचं समर्थन करणाऱ्या पाकिस्तानचे इम्रान खान यांनीही सातत्याने तालिबान्यांची बाजू घेतली होती. त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्रीही तालिबानच्या समर्थनार्थ विधानं करत आहेत. मात्र, आता इम्रान खान यांनी आपल्या भूमिकेशी फारकत घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या महत्त्वाच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयाचं कौतुक केलं असून हे एक समजूतदार पाऊल असल्याचंही म्हटलं आहे. त्याचबरोबर बायडेन यांच्यावर अन्यायकारक टीका होत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे. खान यांनी १७ सप्टेंबर रोजी एका रशियन वृत्तवाहिनीला सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्यावर खूपच अन्यायकारक टीका झाली आणि त्यांनी जे केले ते सर्वात समंजसपणाचे काम होते.

हेही वाचा – “…त्याची आम्हाला मोठी किंमत चुकवावी लागली”; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची नाराजी

पाकिस्तानने अफगाणिस्तानातला गोंधळ आवरावा अशी अपेक्षा अमेरिकेने बोलून दाखवल्याच्या एका महिन्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बायडेन यांचं कौतुक केलं आहे. काबूल तालिबान्यांच्या हातात जाण्याआधी ऑगस्टच्या सुरुवातीला खान यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गेली २० वर्षे लष्करी उपाय शोधण्यासाठी पाकिस्तानचा सातत्याने वापर केल्यामुळे देशात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, उपाय सापडला नाहीच.

अफगाणिस्तानच्या भूमीतून सैन्य मागे घेण्याच्या बिडेनच्या निर्णयावर खान यांनी वारंवार टीका केली होती. जूनच्या उत्तरार्धात न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तालिबानवरचा पाकिस्तानचा प्रभाव कमी झाल्याबद्दल अमेरिकी सैन्याच्या माघारी जाण्याला जबाबदार ठरलं आहे. “अमेरिकेने माघार घेण्याची तारीख दिल्यापासून तालिबानवरचं आमचं नियंत्रण कमी झालं”, असं खान म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Imran khan says us afghanistan withdrawal was sensible defends biden against unfair criticism vsk

ताज्या बातम्या