आंध्रप्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ काँग्रेसने उडवले काळे फुगे, मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत यापूर्वीही चूक झाल्याचे पुढे आले होते.

Andhra Pradesh Congres worker released black balloons into air Near PM Modi helicopter
संग्रहित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंद्रप्रदेशच्या दौऱ्यावर असताना काँग्रेसकडून काळे फुगे उडवत पंतप्रधान मोदींचा दौऱ्याचा विरोध करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ हे फुगे उडवण्यात आले. यावेळी पोलिसांनी चार काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, हे काँग्रेस कार्यकर्ते मोदी यांच्या हेलिकॉप्टरपर्यंत पोहोलचल्याने पंतप्रधानाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एका ऐरणीवर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ( सोमवार ४ जुलै ) आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता जाणार होते. यावेळी विजयवाडा येथून उड्डाण घेण्यापूर्वी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हेलिकॉप्टरजवळ पोहोचून काळे फुगे उडवत निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी फुगे उडवणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचे पुढे आले होते. पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान पठाणकोटमध्ये जात असताना काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला होता. यावेळी त्यांना जवळपास अर्धातास रस्त्यावर अडकून राहावे लागले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In andhra pradesh congres worker released black balloons into air near pm modi helicopter spb

Next Story
उदयपूर आणि अमरावतीतील घटनेचा हेतू एकच; अमरावती पोलीस आयुक्तांची माहिती
फोटो गॅलरी