नोकरी शोधण्याचे खरं तर असंख्य मार्ग आहेत. मात्र, अनेक वेळा पात्रता असूनही नोकरी मिळणे कठीण होते. अशा वेळी निराशा येणं स्वाभाविक असतं. मात्र, अशा परिस्थितीतही बंगळूरुतील एका विद्यार्थ्याने निराश न होता. नोकरी शोधण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. हा मुलगा बंगळूरुतील स्टार्टअपच्या ऑफिसमध्ये जाऊन आपला रेझूमी आणि पेस्ट्री डिलीव्हर करतो आहे.

अमन खंडेलवाल असं या युवकाचे नाव आहे. त्याने पुण्यातील व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था (IMDR) येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केल आहे. सद्या तो व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून काम मिळण्याच्या शोधात बंळूरुत आहेत.

अमन हा झोमॅटो बॉयची टीशर्ट घालून बंगळूरुतील स्टार्टअपच्या ऑफिसमध्ये जाऊन आपला रेझूमी आणि पेस्ट्री डिलीव्हर करतो आहे. त्याने ट्विटरवर झोमॅटो टी-शर्ट आणि पेस्ट्रीचा बॉक्स घातलेले स्वतःचे फोटो देखील शेयर केले आहेत. बॉक्सला एक चिठ्ठी लिहिली आहे.

अमन खंडेलवालची नोकरी शोधण्याची ही कल्पना सोशल मीडियावर सद्या चर्चेचा विषय बनली आहे.