scorecardresearch

महिलेला फरपटत नेत मंदिराबाहेर काढलं; पुजाऱ्यासह मंदिरातील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

महिलेने पुजाऱ्याच्या अंगावार थुंकल्याचा आरोप करत तिला फरपटत मंदिराबाहेर नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महिलेला फरपटत नेत मंदिराबाहेर काढलं; पुजाऱ्यासह मंदिरातील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
फोटो सौजन्य – सोशल मीडिया

महिलेने पुजाऱ्याच्या अंगावार थुंकल्याचा आरोप करत तिला फरपटत मंदिराबाहेर नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरूमधील वेंकटेश मंदिरात ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी महिलेल्या तक्रारीनंतर मंदिराच्या पुजाऱ्यासह कर्माचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – Delhi Accident : कंझावाला अपघात प्रकरणातील सातव्या आरोपीचे आत्मसमर्पण; दिल्ली पोलिसांची माहिती

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २१ डिसेंबर रोजी एक महिला बंगळुरूमधील वेंकटेश मंदिरात शिरली होती. यावेळी ती स्वत:ला वेंकटेशची पत्नी असल्याचे सांगत होती. तसेच तिने वेंकटेशच्या मुर्तीजवळ बसण्याचा आग्रह केला. मात्र, पुजाऱ्याने विरोध केल्यानंतर ती पुजाऱ्याच्या अंगावार थुंकली. या प्रकारानंतर मंदिरातील कर्मचाऱ्यांनी तिला फरपटत बाहेर नेले.

हेही वाचा – बद्रिनाथचे प्रवेशद्वार जोशीमठ खचू लागले.. ; जमिनीला भगदाडे, साडेपाचशेहून अधिक घरांना तडे, सहाशेहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर

दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुजाऱ्यासह मंदिरातील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ही महिला मानसिक रोगी असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 09:43 IST

संबंधित बातम्या