लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळताच भाजपाच्या कार्यकर्त्याने गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन बळी देत स्वत:ची बोटं दान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गेश पांडे (३०) असं या भाजपा कार्यकर्त्याचं नाव आहे. ४ जून रोजी छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये ही घटना घडली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सुरुवातीला काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. इंडिया आघाडी सरकार बनवणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे निराश झालेल्या दुर्गेश पांडे यांनी गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन भाजपाचा विजय व्हावा, यासाठी प्रार्थना केली होती.

This State Approves Bill 100 Percent Reservation For Private Jobs
Reservation: आता खासगी नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण, ‘या’ राज्याची विधेयकाला मंजुरी
Swami Avimukteshwaranand controversy PM Modi
Swami Avimukteshwaranand : “राजकीय पुढारी धर्मात लुडबुड…”, पंतप्रधान मोदींचं नाव घेत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पुन्हा घणाघाती टीका
Shooting at Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार होताना ‘ती’ महिला शांत का होती? हल्ल्याचं गूढ वाढलं!
Andhra Pradesh minor student rape and murder
Andhra rape-murder : आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी मोबाइलवर पॉर्न पाहिलं; अल्पवयीन आरोपींची धक्कादायक कबुली
Attack on Donald Trump, Iran Connection?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचं ‘इराण कनेक्शन’ सांगणारी थिअरी काय आहे?
Son set fire to mother
Son Set Fire To Mother : मालमत्तेच्या वादातून मुलाने आईला पेटवलं; लायटरने जाळलं अन्…, पोलिसांसमोरच निर्दयी लेकाचं क्रूर कृत्य!
Oil Tanker Capsized in Oman
Oman Oil Tanker Sinks : ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडाले; १३ भारतीयांसह १६ कर्मचारी बेपत्ता
Four Army jawans martyred in Kashmir
काश्मीरमध्ये चार जवान शहीद; जम्मूच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी चकमक
Submit a reply within two weeks Supreme Court order to Ajit Pawar group
दोन आठवड्यांत उत्तर सादर करा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

हेही वाचा – ‘कंपनीचा वेळ, वीज अन् इंटरनेट…’ कामावर इन्स्टाग्राम, नेटफ्लिक्स पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला HR ची नोटीस; पोस्ट पाहून नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

पुढे काही तासांनंतर संपूर्ण निकाल जाहीर झाला, तेव्हा भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले होते. त्यामुळे देवीने आपली प्रार्थना ऐकली, या भावनेतून दुर्गेश पांडे याने पुन्हा मंदिरात जाऊन आपल्या डाव्या हाताची बोटे छाटत देवीला दान दिली.

दुर्गेशने बोटं छाटताच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यावेळी स्थानिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, जखमी मोठी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अंबिकापूरयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्या उपचार केले. मात्र, तुटलेली बोटं जोडण्यात डॉक्टरांना यश आले नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेशची प्रकृती सध्या ठीक आहे.

यासंदर्भात बोलताना दुर्देश पांडे म्हणाला, ज्यावेळी काँग्रेस पक्ष आघाडीवर होता, त्यावेळी मला नैराश्य आले होते. त्यामुळे मी गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन भाजपाच्या विजयासाठी प्रार्थना केली होती. संध्याकाळी जेव्हा भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले, तेव्हा मी पुन्हा देवीच्या मंदिरात गेलो आणि माझी बोटे छाटत मी देवीला दान दिले.

हेही वाचा – एकदाचा मिळाला! सात तासांची अथक मेहनत अन् महिलेला मिळाला आयफोन परत; पाहा शोध घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ‘हा’ VIDEO

पुढे बोलताना त्याने भाजपाला ४०० जागा न मिळाल्याबाबतही प्रतिक्रिया दिली. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला आता बहुमत मिळालं आहे. ते आता सरकारही स्थापन करतील. मात्र, भाजपा ४०० जागा मिळू शकल्या नाहीत, त्याचं दु:ख आहे. जर भाजपाने ४०० जागा जिंकल्या असत्या, तर मला आनंद झाला असता, असे तो म्हणाला.

दरम्यान, यंदा लोकसभा निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजपाला ५४३ पैकी २३४ जागा मिळाल्या. तर मित्र पक्षाच्या जागा मिळून एनडीएने २९३ पर्यंत मजल मारली. उद्या ( ९ जून रोजी ) नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.