एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर दोन तरुणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या आठवड्यात चेन्नईच्या अण्णा नगर भागात ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

इंडिया टुडेने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, १५ वर्षीय अल्पवयीन तरुणी ही ११ व्या वर्गात शिकत असून ती काही दिवसांपूर्वीच अण्णा नगर भागातील एका कॅफेत गेली होती. यावेळी या कॅफेत असलेल्या एका महिलेबरोबर तिची ओळख झाली. गेल्या आठवड्यात या महिलेने तिचा वाढदिवस असल्याचे सांगत या तरुणीला तिच्या घरी आमंत्रित केले होते.

हेही वाचा – पुणे : कोंढव्यातील दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पीडित तरुणी आरोपी महिलेच्या घरी गेल्यानंतर त्याठिकाणी दोन तरुणदेखील होते. यावेळी महिलेने तरुणीच्या जेवणात गुंगीचं औषध टाकले. त्यामुळे ही तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर या तरुणांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून तरुणी अस्वस्थ असल्याचे जाणवताच तिच्या बहिणीनेला तिच्याकडे विचारपूस केली तसेच तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

हेही वाचा – मुंबई: व्यावसायिकाचे अपहरण, पैशांच्या वादातून घडला प्रकार

आई वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एका तरुण आणि महिला आरोपीला अटक केली आहे. तसेच अन्य एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक्षा आणि सोमेश अशी अटक करण्यात आलेल्या दोघांनी नावे आहे. तर फरार आरोपीचं नाव विलियम्स असल्याचं पुढे आलं आहे.