‘विक्रमादित्य’चे आगमन

विक्रमादित्य ही युद्धनौका शनिवारी अखेर भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौका बांधणीसाठी २.३ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च झाला आहे.

विक्रमादित्य ही युद्धनौका शनिवारी अखेर भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौका बांधणीसाठी २.३ अब्ज अमेरिकी डॉलर  खर्च झाला आहे. किमान ४४,५०० टन वजनाची ही युद्धनौका असून ती सेवमॅश जहाजबांधणी केंद्रातून उत्तर आक्र्टिक बंदरात उतरवण्यात आली.
संरक्षण मंत्री ए.के.अँटनी व रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन व वरिष्ठ सरकारी अधिकारी, दोन्ही देशांचे नौदल अधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी युद्धनौकेवरील रशियन ध्वज उतरवण्यात आला व भारतीय नौदलाचा झेंडा त्याच्याजागी फडकला. पारंपरिक भारतीय पद्धतीने नारळ फोडून या युद्धनौकेला नौदलात सामील करण्यात आले.
ही युद्धनौका कार्यान्वित करण्याबाबतच्या करारावर युद्धनौका निर्यातदार कंपनी रोसोबोरोन एक्सपोर्टचे इगॉर सेवास्त्यानोव व युद्धनौकेचे कप्तान सूरज बेरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या, असे रशियाच्या
‘आरआयए नोवोस्टी’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. खरेतर विक्रमादित्य ही युद्धनौका २००८ मध्येच मिळणे अपेक्षित होते पण ती मुदत संपून गेल्यानंतरही ती मिळाली नाही. आता ही युद्धनौका दोन महिन्यांच्या प्रवासानंतर भारतात  येणार आहे.

* वजन – ४४,५०० टऩ
* लांबी – २८४ मीटऱ
* मूळ नावे – बाकू व अॅडमिरल गोर्शकोव़
* सज्जता – मिग २९ के विमान, कामोव ३१, कामोव २८ युद्धनौकाविरोधी हेलिकॉप्टर्स़
* अंतिम मुक्काम – कारवाऱ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In cold snowing severdovinsk india handed over its newest warship ins vikramaditya

ताज्या बातम्या