आम्ही महात्मा गांधी आणि सरदार पटेलांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रयत्न केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजकोट येथील एका रुग्णालयाचं उद्घाटन केलं.

narendra modi sardar patel mahatma gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजकोट येथील एका रुग्णालयाचं उद्घाटन केलं. उद्घाटन केल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं की, गेल्या आठ वर्षांत आम्ही महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठ वर्षात आम्ही असं एकही काम केलं नाही, ज्यामुळे लोकांची मान शरमेनं झुकेल.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, “आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेची सेवा केली. त्यांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला. कोविड -१९ साथीच्या काळात आम्ही गरीब जनतेसाठी देशातील अन्नधान्य साठा खुला केला आणि प्रत्येक नागरिकाचं लसीकरण केलं आहे.”

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षात आम्ही महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या स्वप्नांतील भारत घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. देशातील गरीब, दलित, पीडित, आदिवासी, महिलांना सक्षम करेल असा भारत महात्मा गांधींना हवा होता. अगदी तसाच प्रयत्न आम्ही केला.

गरिबांचं सरकार असेल तर ते गरिबांची सेवा कसं करतं, त्यांना सक्षम करण्याचं काम कसं करतं, हे आज संपूर्ण देश पाहत आहे. १०० वर्षांतील सर्वात मोठ्या संकट काळातही देशाने सातत्याने याचा अनुभव घेतला आहे. करोना संसर्गाच्या काळात देशातील गरीबांसमोर खाण्यापिण्याची समस्या होती. तेव्हा आम्ही देशातील धान्याचे कोठार खुले केले, असंही मोदी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In eight years we made honest efforts to build india of the dreams of mahatma gandhi and sardar patel said pm narendra modi rmm

Next Story
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या भरती प्रक्रियेची नवीन प्रणाली; चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणार सर्व सैनिक
फोटो गॅलरी