रेशन खरेदी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी सक्ती केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर या व्हिडीओची दखल घेत हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तिरंगा खरेदीची सक्ती करणाऱ्या रेशन दुकानाचा परवाना रद्द केला आहे.

हेही वाचा – “…तर चौथे मोदी जेवले म्हणून समजा”; जीएसटीवरून बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारला टोला

कर्नाल जिल्ह्यातील हेमडा गावात एक रेशन दुकानात राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी २० घेण्यात येत होते. तसेच हा राष्ट्रध्वज विकत न घेतल्यास ध्यान देणार नाही, असा पावित्रा या दुकांनाी घेतला होता. यासंदर्भातील ग्राहकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आली. कर्नालच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी करत या रेशन दुकानदारांचा परवाना रद्द केल्याची माहिती उपायुक्त अनिश यादव यांनी दिली..

हेही वाचा – ‘भाजपा मित्रपक्ष संपवायचं काम करते’ या टीकेवरुन फडणवीसांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “पवार साहेबांचं दु:ख…”

अशा प्रकारे कोणी नागरिकांची दिशाभूल करत असेल तर याची माहिती तत्काळ अधिकाऱ्यांना द्यावी. जनतेच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने रेशन दुकाना ८८ हजार ४०० राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले आहेत. कोणी तो २० रुपये देऊन विकत घेऊ शकतो. त्यासाठी कोणतीही बंधन नाही, असे अनिश यादव यांनी म्हटले आहे.

हेही वाचाव – नितीशकुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय ठरणार का? बिहारमधील राजकीय उलथापालथ म्हणजे लोकसभा निवडणुकीची तयारी?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत घरांवर राष्ट्रध्वज फडकवला जाणार असल्याची माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली होती.