केनिया सरकारने करवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याविरोधात नैरौबीमध्ये नागरिकांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरत केनिया सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. इतकचं नाही, त्यांनी थेट केनियाच्या संसदेत प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, या आंदोलकांना पांगवण्याठी पोलिसांना अखेर गोळीबार करावा लागला. या गोळीबाराच्या घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर काही जण जखमी झाल्याचंदेखील सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – Parliament Session 2024 : शपथ घेतल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’ ही घोषणा का दिली? असदुद्दीन ओवैसी म्हणाले…

रायटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, केनिया सरकार त्यांच्या संसदेत एक वित्त विधेयक पारीत करण्याचा प्रयत्नात आहे. हे विधेयक पारीत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून या विधेयकाला विरोध केला जातो आहे. येथील नागरिकांनी केनियाचे राष्ट्रपती रुटो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती रुटो यांनी सत्तेत आल्यानंतर गरिबांच्या हिताचे निर्णय घेईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी याउलट निर्णय घेत, कर वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे राष्ट्रपती रुटो यांनी एकप्रकारे जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

या करवाढीचा विरोध करण्यासाठी आज हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत ससंदेला घेराव घालण्याचा तसेच संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना संसदेच्या मुख्य द्वाराजवळ रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याचंदेखील बघायला मिळालं. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट संसद परिसरात जोळपोळ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी संसद परिसरातील एका इमारतीला आगदेखील लावली.

हेही वाचा – महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, हत्या आणि मृतदेहाचे तुकडे ठेवले दोन ट्रेन्समध्ये, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

दरम्यान, यावेळी आंदोलकांचा जमाव आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचा निर्णय घेतला. या गोळीबाराच्या घटनेत आतापर्यंत १० जणंचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितलं जात आहे.