पराराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी बुधवारी रात्री पाकिस्तानचे पराराष्ट्र सचिव अझिज चौधरी यांना पत्र लिहून यापुढे फक्त सीमेवर होणा-या दहशतवादावर चर्चा होईल असे सांगितले. १५ ऑगस्टला पाकिस्तानच्या पराराष्ट्र सचिवांनी एस जयशंकर यांना पत्र पाठवून चर्चेचे आमंत्रण देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर १९ ऑगस्टला काश्मीरमधल्या हिंसाचाराप्रकरणी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानाने औपचारिक चर्चेचे निमंत्रण भारताला पाठवले होते. या पत्राला याआधीच भारताने उत्तर दिले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत चर्चा होईल पण पाकिस्तानने ठरवून दिलेल्या विषयांवर नाही हे भारताने आधीच स्पष्ट केले होते. भारत पाकिस्तानशी काश्मीरविषयी नाही तर सीमेवर होणा-या दहशतवादावर चर्चा करने असेही भारताकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे  एस जयशंकर यांनी पाकिस्तानला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर पाकिस्तान चर्चा करण्याचे गांर्भीयाने घेत असेल तर दोन्ही देशांमध्ये काही मुद्द्यावर सुरूवातीपासून चर्चा व्हायला हवी. यात पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ला देखील चर्चीला गेला पाहिजे असेही भारताने पत्राने म्हटल्याचे समजते आहे. पाकिस्तानला चुकीचे मुद्दे काढून खेळी करायची असेल तर आम्हाला देखील असे खेळ खेळता येतात अशीही तंबी पत्राद्वारे भारताने दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि पराराष्ट्र सचिव एस जयशंकर मिळून या विषयावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची योजना आखत असल्याचीही माहिती सुत्राने दिली आहे.