scorecardresearch

जबरदस्तीने चुंबन करणं तरुणाला चांगलंच भोवलं! तरुणीने चावा घेतला अन्…; धक्कादायक घटना समोर

मोहित सैनी असं आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

uttar pradesh crime news
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं असून तरुणीने दाताने त्यांच्या ओठाचा चावा घेतल्याने तरुणाचे ओठ चिरले गेले आहे. मोहित सैनी असं आरोपी तरुणांचे नाव आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हाही दाखला केला आहे.

हेही वाचा – Tech Layoffs: गुगल, फिलिप्सपाठोपाठ आणखी एका टेक कंपनीचा कामगारांना धक्का, ६६५० जणांची नोकरी जाणार

‘आज तक’ने उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ४ फेब्रुवारी रोजी मेरठमधील दौराला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतशिवारात एक तरुणी आपल्या शेतात काम करत होती. यावेळी मोहित सैनी या तरुणाने मागून येऊन तिला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती तरुणी खाली पडली. दरम्यान, त्याने तिचे कपडेही फाडले. तसेच तिच्या तोडावर हात ठेवत ओरडली तर इथेच जीवाने मारेन, अशी धमकीही दिली. यावेळी त्याने जबरदस्तीने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणीने आपल्या दाताने आरोपीच्या ओठाचा चावा घेतल्याने त्याचे खालचे ओठ चिरले गेले आणि शरीरावेगळे झाले.

हेही वाचा – भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये विध्वंस, मृतांची संख्या १,३०० पार, बचावकार्यासाठी भारत NDRF च्या २ टीम Turkey ला पाठवणार

यावेळी आरोपीने जोरात ओरडण्यास सुरूवात केल्यानंतर शेजारी असलेल्या शेतातून काही लोक बघायला आले. यावेळी मुलीने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीला अटक केली. तसेच त्याचे वेगळे झालेले ओठ जप्त केले. दरम्यान, आरोपीला सध्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याचं दौराला पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय शर्मा यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 17:09 IST