चोवीस तासांत ‘बीएसएफ’चे आणखी २१ जवान करोना पॉझिटिव्ह

सद्यस्थितीस ३०५ जवानांवर उपचार सुरू

प्रतिकात्मक छायाचित्र
देशात करोना विषाणुचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सामान्य माणसांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस व संरक्षण दलातील जवानांना देखील करोनाची बाधा होत आहे. मागील चोवीस तासांत सीमा सुरक्षा दलाचे आणखी २१ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, १८ जणांनी करोनावर मात केली आहे.

सध्या ३०५ जवानांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत एकूण ६५५ जणांनी करोनावर मात केली असल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले आहे.

मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल १९ हजार ४५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण ५ लाख ४८ हजार ३१८ करोनाबाधितांमध्ये, सध्या उपचार सुरू असलेले २ लाख १० हजार १२० रुग्ण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले ३ लाख २१ हजार ७२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १६ हजार ४७५ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: In the last 24 hours 21 more border security force bsf personnel tested positive for covid19 msr