Turkey Syria Earthquake 2023: टर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. या घटनेत आतापर्यंत ४६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देशामध्ये अद्याापही बचावकार्य सुरु आहे. मात्र या दरम्यान संपूर्ण जगाला अचंबित करणारी एक घटना घडली.

हेही वाचा – Viral: भावाचा नादच खुळा! स्कुटीला फॅन्सी नंबर लावण्यासाठी १.१२ कोटींची लावली बोली, ‘हा’ नंबर पाहून व्हाल थक्क

Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
unlisted firms donate electoral bonds
नफ्यापेक्षा दुप्पट रोखे दान; आठ कंपन्यांचा प्रताप
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

१३ दिवसांपासून अन्न पाण्याशिवाय ढिगाऱ्याखाली

बचाव पथकाने १३ दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन नागरिकांना जिवंत बाहेर काढलं आहे. हे तिघेही १३ दिवसांपासून अन्न पाण्याशिवाय ढिगाऱ्याखाली अडकले होते. एकाबाजूला या भूकंपामुळे हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दुसऱ्या १३ दिवसांपासून अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर याला निसर्गाचा चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी बचाव पथकाने १२ दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका ४५ वर्षीय नागरिकाला जिवंत बाहेर काढले होते.

नवजात बाळालाही सुखरुप बाहेर काढले

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच टर्कीच्या हेते प्रॉविन्स येथे एका घराच्या ढिगाऱ्याखालून एक नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. १२८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बाळाला जिवंत बाहेर काढण्यात आले. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हेही वाचा – निक्की यादव हत्याकांडात मोठा खुलासा; २०२० मध्येच आरोपी साहिलशी केलं होतं लग्न!

६ फेब्रुवारी रोजी टर्की-सीरियामध्ये भूकंप

टर्की आण सीरियामध्ये ६ फेब्रुवारी रोजी ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर जगभरातून मदतीचा ओघ दोन्ही देशाकडे सुरु झाला आहे. भारताने ऑपरेशन दोस्तच्या अंतर्गत मदत पाठविली आहे. भारताची एनडीआरएफ टीम टर्की आणि सीरियामध्ये बचाव कार्य करत आहे.