कुत्र्याने तोंडात धरला होता मानवी हात; ‘असं’ उलगडलं उन्नावमधल्या ऑनर किलींग प्रकरणाचं गूढ

जेव्हा मुलीने तिच्या वडिलांना धमकी दिली की ती हत्येबद्दल गावकऱ्यांना सांगेल, तेव्हा तिचाही गळा दाबून खून करण्यात आला.

उत्तरप्रदेश पोलिसांना सोमवारी संध्याकाळी उन्नावमधल्या एका जोडप्याचे मृतदेह शेतामध्ये सापडले होते. उन्नाव पोलिसांनी ह्या हत्या ऑनर किलींगच्या उद्देशाने केल्याचा दावा केला होता. आता या दोन्ही हत्या नक्की कशामुळे झाल्या, ह्या हत्यांचं गूढ कसं उलगडलं ही माहिती समोर आली आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांना १९ ऑक्टोबर रोजी उन्नावमधील शेतातून एका जोडप्याचे मृतदेह सापडले होते. उन्नाव पोलिसांनी ही हत्या ऑनर किलिंग असल्याचा दावा केला आहे. उन्नावचे पोलीस अधीक्षक (एसपी) अविनाश पांडे म्हणाले, “आम्ही मुलीच्या वडिलांना आणि तिच्या चुलत भावाला हत्येमध्ये सहभागी केल्याबद्दल अटक केली आहे. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, 19 ऑक्टोबर रोजी गावात एक कुत्रा मानवी हात तोंडात धरुन फिरताना आढळल्याने भिखारीपूर गावातील लोक हादरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली आणि त्यांची चौकशी सुरू केली.

उन्नावचे एसपी पांडे म्हणाले, “मानवी हात सापडल्यानंतर आम्ही शोध मोहीम सुरू केली. आमच्या टीमला गावातील राम सिंह यांच्या शेतातून एक मुलगा आणि एका मुलीचा मृतदेह सापडला. एसपी पुढे म्हणाले की तपासादरम्यान पथकाला कळले की मृत दोघेही गावातील रहिवासी आहेत आणि त्यांचे नातेसंबंध होते. पुरूषाच्या मृतदेहाची ओळख राम सिंहचा मुलगा बालकृष्ण आणि सरला म्हणून महिलेची ओळख पटली.उन्नाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकृष्णाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांसह इतर अनेकांविरोधात तक्रार दाखल केली होती.

स्थानिक पोलिसांनी पुढे सांगितले की सरलाचे वडील आणि इतर अनेक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. “चौकशीदरम्यान, मुलीच्या वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली,” एसपी पुढे म्हणाले. एसपींनी माध्यमांना सांगितले की, मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की १२ ऑक्टोबरच्या रात्री त्यांची मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे आढळले. त्यांनी नातेवाईकांसह शोधमोहीम सुरू केली.

“सरलाच्या वडिलांनी आम्हाला सांगितले की त्यांना त्यांची मुलगी आणि बाळकृष्ण शारिरीक संबंध करत असताना आढळून आले. सरलाच्या वडिलांनी आणि काकांनी बाळकृष्णवर काठ्यांनी हल्ला केला आणि नंतर त्याचा गळा दाबून खून केला. जेव्हा मुलीने तिच्या वडिलांना धमकी दिली की ती हत्येबद्दल गावकऱ्यांना सांगेल, तेव्हा तिचाही गळा दाबून खून करण्यात आला,” एसपी पुढे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In up couple found in compromising position killed by girls father cousin vsk

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या