scorecardresearch

Premium

‘मोदी’ आडनाव बदनामी प्रकरण; राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात धाव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुरत न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

Opposition no confidence motion will be discussed
लोकसभेत आजपासून पुढचे तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर चर्चा (संग्रहित फोटो)

२०१९ मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरुन टिप्पणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विजय माल्या, नीरव मोदी व ललित मोदी अशा कर्जबुडव्या उद्योगपतींचा उल्लेख करत ‘सर्व चोर मोदीच का असतात’ असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. कर्नाटक निवडणुकीच्या रॅलीत मोदी आडनावाबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर गुजरातमधील भाजपाचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

याप्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुरत न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

hasan mushrif nana patole
फसवणूक केल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवूनही मुश्रीफ सत्तेत; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
supreme court
सिसोदियांचा सहभाग दर्शवणारे पुरावे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाकडून ईडी, सीबीआय फैलावर
supreme court canceled demolish order of 14 buildings in diva
दिव्यातील दोन हजार रहिवाशांना दिलासा; १४ इमारती तोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
sanjay-shirsat
आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली, अध्यक्षांचा निर्णय काय? संजय शिरसाट माहिती देत म्हणाले…

तत्पूर्वी, गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या ७ जुलैच्या या आदेशाला राहुल गांधी यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यांनी वकील प्रसन्न एस यांच्यामार्फत हे अपील सादर केलं आहे.

या मानहानी प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर २४ मार्च २०२३ रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी याचिका गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात केली. मात्र, ‘राजकारणातील पावित्र्य’ ही काळाची गरज आहे, असे सांगून उच्च न्यायालयाने ७ जुलैला त्यांची याचिका फेटाळून लावली. या आदेशाला राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inc leader rahul gandhi moves supreme court modi surname defamation case rmm

First published on: 15-07-2023 at 23:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×