scorecardresearch

छोटय़ा शहरांतील मोठय़ा करचोरीला चाप; रुग्णालये आणि मंगलकार्यालयांवरही आता प्राप्तिकर विभागाची नजर

मोठय़ा रकमेचे रोखीने व्यवहार करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

छोटय़ा शहरांतील मोठय़ा करचोरीला चाप; रुग्णालये आणि मंगलकार्यालयांवरही आता प्राप्तिकर विभागाची नजर
अनेकजणांनी आजवर बदनामीला घाबरून या अकाउंटला पैसे पाठवले आहेत. (फोटो: संग्रहित)

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : मोठय़ा रकमेचे रोखीने व्यवहार करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. मोठी रुग्णालये, मंगल कार्यालये, मॉलमधील मोठी खरेदी, आलिशान वाहन- घरांची खरेदी किंवा रोखीने मोठे उत्पन्न मिळविणाऱ्या व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर आहे. प्राप्तिकर विभागाने आता आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला असून भूतकाळातील करांसाठी तगादा लावण्यापेक्षा अशा मोठयम व्यवहारांवर नजर ठेवून वसुली करण्याची योजना आखली आहे.

 गेल्याच आठवडय़ात अलवर, कोटा आणि जालना यांसारख्या लहान शहरांमधील प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम आणि बेकायदेशीर संपत्ती मिळाली. जालना येथे स्टील उत्पादकांच्या मोठय़ा प्रमाणात रोख आणि दागिने जप्त करण्यात आले.

रुग्णालयांच्या बाबतीत नियमाने कितीही बंधनकारक असले तरीही त्यांच्याकडून पॅन क्रमांक घेतला जात नाही. प्राप्तिकर विभाग यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र रुग्णालयांकडून रोखीत बीजक देणाऱ्या रुग्णांची माहिती बेकादेशीररित्या इतर आरोग्य सेवा पुरवठादारांना कळविली जाते, त्या माहितीच्या माध्यमातून अशा रुग्णांचा शोध घेतला जातो. रुग्णांकडून पॅन क्रमांक गोळा करणे नेहमीच शक्य नसते, कारण सामान्यत: बरेचशे रुग्ण आपत्कालीन आरोग्य सेवा घेण्यासाठी येतात, अशी कारणे देत रुग्णालये त्यांच्या जबाबदारीतून हात झटकतात, अशी माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्याने सांगितले.

प्राप्तिकर विभागाकडून नोटीस कधी?

व्यक्तीकडून विहित मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार झाला असेल आणि करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्र भरताना म्हणजेच आयटीआर फाइिलगमध्ये त्याचा खुलासा केला नसेल, तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते.

कारण काय?

लहान शहरांमध्ये प्राप्तिकर विभागाची फारशी उपस्थिती नसल्याने अशा ठिकाणी मोठया प्रमाणावर रोखीने व्यवहार पार पडतात. प्राप्तिकर विभागाच्या नजरेतून लहान शहरांमधील व्यवहार दुर्लक्षिले जातात. त्यामुळे अशा ठिकाणी करचोरी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

लक्ष कुठे?

प्राप्तिकर विभागाने चालू आर्थिक वर्षांत अनेक व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले आहे, मुख्यत: ज्या ठिकाणी अजूनही रोखीने व्यवहार पार पडतात अशी ठिकाणे आता प्राप्तिकर विभागाच्या नजरेत आले आहेत.

निमित्त कोणते?

जालन्यात प्राप्तिकर विभागाकडून गेल्या आठवडय़ात मोठी कारवाई झाली. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर सुमारे ३९० कोटींचे घबाड सापडले. ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज त्यात होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Income tax department hospitals funeral parlors ysh

ताज्या बातम्या