पीटीआय, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी त्यांचे राष्ट्रपती-उपराष्ट्रपती, भाजप नेत्यांसह विरोधी पक्षांच्या नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभीष्टचिंतन केले. या निमित्त दर वर्षी विकास प्रकल्पांचा प्रारंभ केला जातो. भाजपतर्फे सेवा उपक्रम राबवले जातात. यंदा मोदींच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले चित्ते सोडण्यात आले. मोदींचे अभीष्टचिंतन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नमूद केले, की मोदींच्या अतुलनीय परिश्रम, समर्पण आणि सर्जनशीलतेच्या जोरावर राष्ट्रउभारणीचे काम सातत्याने होत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, की मोदींची परिवर्तनवादी दृष्टी आणि प्रेरणादायी नेतृत्व भारताला वैभवाच्या नव्या उंचीवर घेऊन गेले आहे.

हेही वाचा <<< लाखो मातांचे आशीर्वाद माझ्यासाठी ऊर्जा, प्रेरणा, संरक्षणकवच : मोदी; बचत गटांतील महिलांशी संवाद

kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
maval lok sabha marathi news, shrirang barne marathi news
मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाची आणि प्रशासकीय कौशल्याची प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही त्यांचे अभीष्टचिंतन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, तुम्हाला उत्तम आरोग्य व आनंदी जीवन लाभण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते.

हेही वाचा <<< नामशेष चित्ते पुन्हा देशात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या अधिवासात मुक्तता

 ‘बॉलीवूड’च्याही शुभेच्छा!

पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अक्षयकुमार यांच्यासह अनेक चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींनी शुभेच्छा दिल्या. बच्चन यांनी ‘ट्वीट’ केले, की आमच्या देशाचे दूरदर्शी नेते, माननीय पंतप्रधान मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. तुम्ही आमच्या देशाला यशोशिखरावर नेत आहात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! शाहरूख खान यांनी मोदींच्या देशाप्रती आणि जनकल्याणार्थ समर्पणाची प्रशंसा केली. तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि आरोग्य लाभो. एक दिवस सुट्टी घ्या आणि तुमच्या वाढदिवसाचा आनंद घ्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे ‘ट्वीट’ शाहरूख यांनी केले. अक्षयकुमार यांनी मोदींसह एक छायाचित्र प्रसृत करून लिहिले, की तुमची दूरदृष्टी, कळकळ आणि काम करण्याची तुमची क्षमता, अशा अनेक गोष्टींपैकी काही गोष्टी ज्या मला खूप प्रेरणादायी वाटतात. ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनीही मोदींसोबतचे त्यांचे छायाचित्र प्रसृत करून, आम्ही कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे भारताला जगाच्या नकाशावर आणल्याबद्दल पंतप्रधानांची प्रशंसा केली. बॉलिवूडसह दक्षिणेतील तारे-तारकांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा <<< दोनतृतीयांश आमदारांच्या पक्षांतरावर दोन राज्यांमधील भिन्न भूमिका; गोव्यात काँग्रेस बंडखोरांचा गट भाजपमध्ये विलीन; राज्यात शिंदे गटाचा शिवसेनेवरच दावा

मोदी हे भारतीय संस्कृतीचे ध्वजवाहक – अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींचे वर्णन ‘भारतीय संस्कृतीचे ध्वजवाहक’ या शब्दांत केले. त्यांनी नमूद केले, की मोदींनी देशाला मुळाशी जोडले. प्रत्येक क्षेत्रात पुढे नेले. मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास आला आहे. त्यांनी स्वत:ची ‘जागतिक स्तरावरील नेता’ अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याकडे जगभरात आदराने पाहिले जाते. सुरक्षित, मजबूत आणि स्वावलंबी नवीन भारताचे मोदी हे शिल्पकार आहेत. त्यांचे जीवन हे सेवा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, की मोदींच्या नेतृत्वाने प्रगती आणि सुशासनाला चालना मिळाली, जी यापूर्वी कधीही दिसली नव्हती. मोदींनी भारताची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान एका नवीन उंचीवर नेला. त्यांनी भारतीय राजकारणाला नवा आयाम दिला असून विकासासह गरिबांच्या कल्याणालाही महत्त्व दिले आहे.

हेही वाचा <<< हैदराबाद मुक्तिदिनावरून शहा-राव शाब्दिक चकमक; भाजप आणि तेलंगणा राष्ट्र समितीत वाद 

काँग्रेसचा ‘बेरोजगार दिन’

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीच्या भयावह परिस्थितीमुळे तरुण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करत असल्याची टीका काँग्रेसने शनिवारी केली. पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त काँग्रेसने शुभेच्छा देत त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘ट्वीट’ केले, की मोदींविरुद्ध आमचा वैचारिक आणि राजकीय संघर्ष सुरूच राहणार आहे. त्यांचे आमच्याविरुद्ध वैयक्तिक सूडभावनेतून राजकारण सुरू आहे. असे असूनही, आम्ही आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो.