PM Narendra Modi Independence Day Speech at Red Fort Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज दिल्लीतील ऐतिहासिक अशा लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवत देशाला संबोधित केले. लाल किल्ल्यावरून हे त्यांचे १३ वे भाषण होते. तब्बल ७५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविद मुद्द्यांना हात घातला.

सर्वांगीण राष्ट्रीय विकास आणि आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान मोदी यांनी सात प्रवाह (सप्तधारा) या संकल्पनेची मांडणी केली. विद्यार्थ्यांवरील कोचिंग क्लासचा भार कमी व्हावा म्हणून त्यांनी मोफत डिजिटल कोचिंग क्लासची घोषणा केली. तसेच २०२६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यासाठी देशभरातील शाळांमधून प्रतिभावान खेळाडू शोधण्याची मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ५ ते १५ वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना आगामी स्पर्धेसाठी तयार करू, असे ते म्हणाले.

Live Updates

Independence Day 2026 Live Updates

18:09 (IST) 15 Aug 2026

Video: जयपूरमधील भाजपच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ची चुकीची धून; प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी मागितली माफी

जयपूरच्या बडी चौपार येथे आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर 'वंदे मातरम'ची मूळ आवृत्ती वाजवण्याऐवजी दुसऱ्याच संगीताची धून वाजवण्यात आली. ...सविस्तर बातमी
17:34 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: 'आयर्लंडचा स्वातंत्र्यदिन आहे का?', पंतप्रधान मोदींच्या खिशात उलटा तिरंगा; काँग्रेसकडून टीका

स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी सलग १३ वे भाषण केले. यावेळच्या त्यांच्या भाषणावरून काँग्रेस टीका करत आहे. पंतप्रधान मोदींच्या कोटातील खिशात तिरंगी रंगाचा रुमाल ठेवण्यात आला होता. या रुमालाच्या रंगाची रचना राष्ट्रध्वजाच्या उलट होती. यामुळे हा आयर्लंडचा राष्ट्रध्वज दिसत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केली.

https://twitter.com/Pawankhera/status/2088479920116613362

16:27 (IST) 15 Aug 2026

लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवताना पंतप्रधान मोदींना सहकार्य करणाऱ्या 'त्या' महिला अधिकारी कोण? सोशल मीडियावर चर्चा

भारतीय सशस्त्र दलांमधील महिला अधिकाऱ्यांच्या वाढत्या सहभागाचे आणि 'नारी शक्ती'चे हे एक उत्तम उदाहरण ठरले, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ...सविस्तर वाचा
14:31 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: पंतप्रधान मोदींच्या भाषणावर अरविंद केजरीवाल यांची टीका

पंतप्रधान मोदी भाषण वाचून दाखवत असताना काही वेळा अडखळले. यावरून टीका करताना अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना आत्मविश्वास नसलेले, निराश आणि डळमळीत पंतप्रधान असल्याचे म्हटले.

14:29 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: पंतप्रधान मोदी भाषण करताना अडखळले, टेलीप्रॉम्प्टर वरून काँग्रेस आणि ‘आप’ची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना टेलीप्रॉम्प्टरचा वापर केला नाही. कागदावरील मुद्दे वाचून दाखवताना ते काही वेळा अडखळताना दिसले. यावरून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने त्यांच्यावर टीका केली.

https://twitter.com/Pawankhera/status/2088518715084005518

14:12 (IST) 15 Aug 2026

पंतप्रधान मोदींच्या 'दिमागी नक्षल' विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; जयराम रमेश म्हणाले, "ते हताश…"

PM Modi Dimagi Naxal Statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्रदिनाच्या निमित्त लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात 'दिमागी नक्षल' अशी टिप्पणी केली होती. यावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. ...सविस्तर बातमी
13:29 (IST) 15 Aug 2026

'विकसित भारता'साठी पीएम मोदींचा ५-पॉइंट रोडमॅप; युवाशक्ती, आत्मनिर्भरता अन् महिला आरक्षणावर ऐतिहासिक घोषणा!

PM Modi Viksit Bharat 5 Point Roadmap : ८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत २०४७'चे उद्दिष्ट गाठण्यासाठी ५ मुद्द्यांचा विशेष रोडमॅप जाहीर केला आहे. ...अधिक वाचा
13:22 (IST) 15 Aug 2026

यवतमाळ : पावसाळी पर्यटनाचा आनंद भोवला! दोन विद्यार्थिनी जलाशयात बुडाल्या, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दुःखाचा डोंगर…

यवतमाळ येथील बोरगाव धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या दोन विद्यार्थिनींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मैत्रिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरीनेही आपला प्राण गमावला. या घटनेने यवतमाळवर शोककळा पसरली आहे. ...वाचा सविस्तर
13:07 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: 'महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये मंजूर झाले आहे', पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची खोचक टीका

महिलांना संसदेत आणि विधानसभेत आरक्षण देण्यासाठी सर्व राज्यांनी आणि सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केले होते. त्यावर राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ रोजीच मंजूर झाले आहे, असे त्यांनी म्हटले.

https://twitter.com/ANI/status/2088524724892828042

12:40 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: 'दिमागी नक्षल मानसिकता', राहुल गांधी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला अनुपस्थित राहिल्यानंतर भाजपाची टीका

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अनुपस्थित राहिल्यानंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांची मानसिकता दिमागी नक्षलवादी गटाची असल्याचे भाजपाने म्हटले. भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी म्हटले की, कोणताही देशभक्त विरोधी पक्षनेता आणि सार्वजनिक पद धारण करणारी व्यक्ती असे कृत्य करू शकत नाही. राहुल गांधी विरोधी पक्षनेते होण्यास अयोग्य आहेत.

12:21 (IST) 15 Aug 2026

Video : भारताचे मिशन 'ऑलिम्पिक २०३६': पंतप्रधान मोदींचे पुढचे मोठे लक्ष्य; खेळाडूंच्या शोधासाठी देशव्यापी 'टॅलेंट हंट'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात २०३६ ऑलिम्पिकसाठी भारताने किमान तीन-चतुर्थांश स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. ...अधिक वाचा
12:01 (IST) 15 Aug 2026

'स्वराज्य मिळाले, पण रामराज्य अजून बाकी आहे', ९९ वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिकाचा ‘जेन झी’ पिढीला संदेश; म्हणाले, "आंदोलने आणि लढा…"

Freedom Fighter YC Revanna: स्वराज्य हा भारतीय चळवळीचा केवळ एक भाग होता. जोपर्यंत आपल्याला रामराज्य मिळत नाही, तोपर्यंत तरुणांनी संघटित होऊन आंदोलन करत राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाने व्यक्त केले. ...अधिक वाचा
11:14 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: पार्थ पवार यांची कायनात दार यांच्यासह लाल किल्ल्यावरील सोहळ्याला हजेरी

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव खासदार पार्थ पवार यांनी भावी पत्नी कायनात दार यांच्यासह लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली.

10:38 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: पंतप्रधान मोदींनी आजवर लाल किल्ल्यावर किती मिनिटांचे भाषण केलेले आहे?

पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मागच्या चार वर्षांतील सर्वात छोटे भाषण केले. २०२५ साली त्यांनी १०३ मिनिटांचे सर्वात मोठे भाषण केले होते.

पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणांचा आजवरचा कालावधी

२०२५ : १०३ मिनिटे

२०२४ : ९६ मिनिटे

२०२३ : ९० मिनिटे

२०२२ : ७४ मिनिटे

२०२१ : ८८ मिनिटे

२०२० : ९० मिनिटे

२०१९ : ९२ मिनिटे

२०१८ : ८३ मिनिटे

२०१७ : ५६ मिनिटे

२०१६ : ९६ मिनिटे

२०१५ : ८८ मिनिटे

२०१४ : ६५ मिनिटे

10:11 (IST) 15 Aug 2026

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची 'सप्तधारा' घोषणा; काय आहेत 'विकसित भारता'चे ७ शक्तिशाली प्रवाह? जाणून घ्या सविस्तर

PM Modi Saptadhara Viksit Bharat 7 Streams : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी 'सप्तधारा' (७ प्रमुख प्रवाह) ही नवी संकल्पना देशवासीयांसमोर मांडली आहे. ...सविस्तर बातमी
10:04 (IST) 15 Aug 2026

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात PM मोदींची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! आता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार मोफत कोचिंग

देशभरातील कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून पालकांवर पडणारा लाखो रुपयांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकार मोफत ऑनलाइन डिजिटल कोचिंग सुविधा सुरू करणार आहे. ...वाचा सविस्तर
09:56 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: ८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ७५ मिनिटांचे भाषण केले

पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून १३ वे भाषण करत असताना तब्बल ७५ मिनिटे देशातील जनतेला संबोधित केले.

09:54 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशातील सर्व विरोधी पक्षांना आवाहन केले की, महिलांना सन्मान देण्यासाठी पुढे या. महिलांना विधानसभेत आणि लोकसभेत ३३ टक्के आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा. महिला आरक्षण लागू करून महिलांना सन्मान देण्यासाठी पुढे या. हवे तर तुम्ही याचे श्रेय घ्या, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

09:53 (IST) 15 Aug 2026

लाल किल्ल्यावरून 'वैचारिक नक्षलवाद्यां'ना पंतप्रधान मोदींचा इशारा; म्हणाले, "सशस्त्र नक्षलवादी संपले तरी..."

PM Modi Dimaagi Naxals : ८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका नव्या धोक्याबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. ...सविस्तर बातमी
09:50 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: शस्त्र घेतलेले नक्षली आम्ही संपवले, मात्र दिमागी नक्षल अराजकतेची संधी शोधत आहेत - पंतप्रधान मोदी

नक्षलवाद, माओवादमुळे देशातील तरूणांना उद्ध्वस्त केले. लाखो युवक यामुळे चुकीच्या मार्गाला गेले. २०१४ साली आम्ही देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचा संकल्प केला होता. आता आम्ही सांगू शकतो की, नक्षलवाद आणि माओवादी हिंसाचार अखरेचे श्वास घेत आहे. ज्याठिकाणी कधी काळी गोळ्या चालत होत्या, त्या ठिकाणी विकास, विश्वास आणि प्रयत्नांचा तिरंगा फडकत आहे. अनेक वर्ष देशातील सत्तेत माओवादी लोकांनी आपली जागा बनवली होती. सरकारी संस्थेतही हे लोक होते. जंगलातील नक्षलवादी संपवण्यात आम्हाला यश मिळाले असले तरी 'दिमागी नक्षल' संधीच्या शोधात आहेत. हिंसा आणि अराजकतेचे मार्ग ते शोधत आहेत. या दिमागी नक्षलींना ओळखून त्यांना बाजूला करावे, लागेल.

09:39 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: उज्ज्वल भविष्यासाठी व्यसन मुक्त भारत करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यसन मुक्त भारत होणे गरजेचे आहे. मागच्या काही काळात स्वयंसेवी संस्था, अध्यात्मिक व्यक्ती, माय भारत स्वयंसेवक, सामाजिक संघटनांनी मिळून नशा मुक्त भारतासाठी १०० आठवड्यांचा कार्यक्रम आखला आहे. मी भारतातील सर्व कुटुंबाना आवाहन करेन की, तुम्हीही या अभियानात सहभागी व्हा आणि व्यसन मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करा.

09:35 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: ऑलिम्पिकसाठी आम्ही खेळाडूंचा शोध घेऊ - पंतप्रधान मोदी

ऑलिम्पिक स्पर्धेतील अनेक खेळ असे आहेत, ज्यात भारताने आजवर सहभाग घेतलेला नाही. २०३६ मध्ये जर भारतात ऑलिम्पिक स्पर्धा भरवायची असेल तर आपल्याला सर्व क्रीडा प्रकारात सहभाग घ्यावा लागेल. यासाठी आम्ही टॅलेंट हंटचे अभियान राबवणार आहोत. ५ ते १५ वर्ष वय असलेल्या मुलांमधील क्रीडा कौशल्य शोधण्यासाठी गावपातळीपासून अभियान चालवले जाईल. मुलांमधील कौशल्य पाहून त्यांना देशपातळीवर खेळण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

09:29 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: भारताला २०३६ चे ऑलिम्पिकचे यजमानपद हवे आहे - पंतप्रधान मोदी

भारतात २०३० मध्ये भारतात राष्ट्रकुल खेळांचे आयोजन होणार आहे. २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भारताला करायचे आहे, अशी इच्छा पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून व्यक्त केली.

09:15 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: कोचिंग क्लासच्या स्पर्धेतून मध्यमवर्गीयांची सुटका, विद्यार्थ्यांना आता मोफत डिजिटल कोचिंग मिळणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

कोचिंग क्लास मध्यम वर्गीय पालकांवर ओझे झाले आहे. पालकांना वाटते मुलाला कोचिंग क्लासमध्ये पाठवले नाही तर आपण प्रतिष्ठित कुटुंब नाही. कुटुंबावर आर्थिक ताण येऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे तज्ज्ञ शिक्षक आहेत, डिजिटल इन्स्फ्रास्ट्रक्चर आहे. याचा उपयोग करून मोफत कोचिंग दिली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.

09:06 (IST) 15 Aug 2026
Independence Day 2026 Live Updates: भारतातील १ कोटी तरुणांना AI कौशल्याचे प्रशिक्षण देणार - पंतप्रधान मोदी

जगात AI चा विस्तार वेगाने होत आहे. लाल किल्ल्यावरून घोषणा करण्यास मला आनंद होत आहे की, आम्ही पुढील वर्षभरात देशातील एक कोटी तरुणांना एआय कौशल्याचे प्रशिक्षण देऊ. जेणेकरून ते जगात एआयचे नेतृत्व करतील.

09:02 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: सॉफ्ट पॉवर ही भारताची सातवी सप्तधारा शक्ती

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताची सातवी शक्ती म्हणजे आपली सॉफ्ट पॉवर. योगने जगाला जोडले. ती आपली ऊर्जा आहे. आपल्याकडे चांगली आरोग्यसेवा असून भविष्यात त्यात आणखी सुधारणा करण्याचे काम करायचे आहे. आपण चित्रपट, गेमिंग, क्रिएटिव्ह वर्ल्ड जगाला दिले आहे. आपल्याकडे १०० हून अधिक राष्ट्रीय उद्याने आहेत. पण जागतिक पर्यटकांना आकर्षिक करण्यात आपण कमी पडलो आहोत. कॉन्सर्टची अर्थव्यवस्था वाढत आहे. जागतिक कलाकार आता भारतात येऊ पाहत आहेत, आपण याला प्रोत्साहन दिले पाहिजे.

08:56 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: हरीत आणि नील अर्थव्यवस्था ही सहावी सप्तधारा शक्ती

हरीत क्षेत्र आणि उत्पादन ही आपली सहावी सप्तधारा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जागतिक तापमानवाढीवर आपण जगाला नव्या उपाययोजना द्याव्या लागतील. नील अर्थव्यवस्थेमध्ये किनारी पर्यटन, मत्सव्यवसाय यासांरख्या अनेक संधी आपल्याकडे आहेत, असेही ते म्हणाले.

08:53 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: 'रक्षा शक्ती', ही भारताची पाचवी सप्तधारा शक्ती

भारताचे संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. रक्षा शक्ती ही भारताची पाचवी शक्ती आहे. आपल्याला ड्रोन, हायपर-सॉनिक तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. तरुणांच्या माध्यमातून सायबर-सुरक्षेचा विकास करायला हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

08:51 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: 'गती शक्ती', ही भारताची चौथी सप्तधारा शक्ती

पंतप्रधान मोदी चौथी सप्तधारा सांगताना म्हणाले की, भारतातील वेगवान कनेक्टिव्हीटी, शहरांना जोडणारी हाय-स्पीड रेल्वे, महामार्ग, अंतर्गत जलमार्ग हे सर्व मल्टी-मोडल लॉजिस्टिक्सने जोडण्याची गरज आहे. बंदाराच्या विकासावरही लक्ष केंद्रीत करायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

08:49 (IST) 15 Aug 2026

Independence Day 2026 Live Updates: 'तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन', सप्तधारेतील तिसरी शक्ती

सप्तधारेतील तिसरी शक्ती तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. अंतराळ, क्वांटम, रोबोटिक्सचे आज युग आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक आव्हाने उभी राहत आहेत, आपल्याला नव्या शोधाचे केंद्र बनावे लागेल. मेड इन इंडिया ६जी कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi Free Coaching Scheme Independence Day speech | Free digital coaching for UPSC aspirants announcement | स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोफत डिजिटल कोचिंग योजना | १ कोटी तरुणांना एआय प्रशिक्षण मोदींची घोषणा

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत दिलासादायक घोषणा केली आहे. (ANI फोटो)