INDIA Bloc Ramlila Maidan Chalo Delhi Rally Updates: गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने आज (१ नोव्हेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
तसेच लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी ‘चलो दिल्ली रामलीला मार्च’मध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. व्होट चोरी रोखण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, इंडिया आघाडीच्या या दिल्लीतील महारॅलीसह सर्व घडामोडी आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
INDIA Bloc Rally Live Updates Ramlila Maidan Delhi : इंडिया आघाडीच्या दिल्लीतील महारॅलीसह सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Video: 'ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते'; 'मतचोरी'वरून राहुल गांधींची टीका; रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचा एल्गार!
"ज्ञानेश कुमार तुरुंगात जातील"; राहुल गांधींचं दिल्लीतील मोर्चात मोठं वक्तव्य
इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा पार पडला. या मोर्चात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "माझे ऐका. मी जे काही बोलतो, ते नेहमी खरे ठरतं. मी भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक तरुणाला सांगत आहे. ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून हटवलं जाईल आणि ज्ञानेश कुमार तुरुंगात जातील. ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय मोदी पंतप्रधान बनू शकले नसते आणि अमित शाह गृहमंत्रीही बनू शकले नसते. शेतकऱ्याला त्याचे हक्क मिळत नाहीत. तरुणांना रोजगार मिळत नाही. कामगाराला त्याचे अधिकार मिळत नाहीत आणि संपूर्ण संपत्ती दोन-तीन लोकांच्या हातात गेली आहे. आम्हाला असा भारत नको आहे आणि आम्ही असा भारत स्वीकारणार नाही", असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
'ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झाले नसते', राहुल गांधी यांचा आरोप
इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा पार पडला. या मोर्चात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "ही काही सामान्य चोरी नाही. सामान्य चोरी म्हणजे जेव्हा कोणी दुकानातून एखादी वस्तू चोरते. ही तर प्रत्येक व्यक्तीच्या आवाजाची चोरी आहे. कायदेशीर भाषेत सांगायचे तर, हा 'सर्वात दुर्मिळ' प्रकार आहे. याला देशद्रोह म्हणतात. ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते आणि अमित शाह गृहमंत्री झाले नसते."
'२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाली' : राहुल गांधी यांचा आरोप
इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा पार पडला. या मोर्चात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक मोठा इशारा दिला. राहुल गांधी म्हणाले की, "या देशात अनेक वर्षांपासून मतांची चोरी होत आहे. मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका - या सर्व निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाली आहे. ईव्हीएमद्वारे, तसेच मतदार याद्यांमधून नावे काढून टाकून किंवा नवीन नावे समाविष्ट करून मते चोरली गेली आहेत."
'२०२४ ची निवडणूक बेकायदेशीर निवडणूक होती' राहुल गांधी यांचा आरोप
"२०२४ च्या निवडणुकीनंतर भारतातील १५ टक्के मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली. याचा अर्थ असा की, २०२४ ची निवडणूक ही एक बेकायदेशीर निवडणूक होती. ही निवडणूक चोरली गेली होती. मी हे स्वतःहून म्हणत नाहीये, तर निवडणूक आयोगच असे सांगत आहे", अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
'संविधान सर्वोच्च आहे', रामलीला मंचावरून राहुल गांधींचा संदेश
रामलीला मैदानावर मंचावरून बोलताना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांचे आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानून केली. "येथे आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. तुम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना एक संदेश द्यायचा होता, तो संदेश पोहोचला. हा केवळ एका राजकीय पक्षाचा आवाज नाही, हा भारतातील तरुण, शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज आहे. हा आवाज सांगतोय की, आम्ही देशातील लोकशाही संपू देणार नाही. तुम्ही स्वतःला खूप मोठे समजत असाल, तुमच्याकडे पैसा असेल, तरीही तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही आहात. संविधान तुमच्यापेक्षा मोठे आहे."
"आम्ही हार मानणार नाही"; माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मोठा इशारा
"बंगाल सध्याच्या परिस्थितीचा बळी ठरलं आहे. आम्ही हार मानणार नाही, आम्ही प्राण देऊ पण आम्ही लढू, आम्ही शरण जाणार नाही. त्यांनी आमच्या बंगालला लुटलं आहे. आम्ही लोकशाही वाचवू आणि ती पुन्हा प्रस्थापित करू. आम्ही राजकारणाच्या माध्यमातून सूड घेऊ. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून सूड घेऊ. आम्ही लढत राहू", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
"२०२७ मध्ये असा निरोप दिला जाईल की पुन्हा..."; अखिलेश यादव यांचा भाजपाला इशारा
इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा पार पडला. या मोर्चात बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, "जे लोक एकेकाळी उत्तर प्रदेशातून आले होते, त्यांना आता उत्तर प्रदेशातूनच बाहेर काढले जाईल. उत्तर प्रदेशातील जनतेला स्वागत कसे करायचे आणि निरोप कसा द्यायचा, हे उत्तम ठाऊक आहे. २०२७ मध्ये असा निरोप दिला जाईल की, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा कधीही परत येऊ शकणार नाहीत."
"२०२७ मध्ये असा निरोप दिला जाईल की पुन्हा..."; अखिलेश यादव यांचा भाजपाला इशारा
इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा पार पडला. या मोर्चात बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, "जे लोक एकेकाळी उत्तर प्रदेशातून आले होते, त्यांना आता उत्तर प्रदेशातूनच बाहेर काढले जाईल. उत्तर प्रदेशातील जनतेला स्वागत कसे करायचे आणि निरोप कसा द्यायचा, हे उत्तम ठाऊक आहे. २०२७ मध्ये असा निरोप दिला जाईल की, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा कधीही परत येऊ शकणार नाहीत."
"लोकशाही वाचवण्यासाठी मोदींना सत्तेतून हटवावंच लागेल"; मल्लिकार्जुन खरगेंचं दिल्लीतील मोर्चात मोठं वक्तव्य
इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा पार पडला. या मोर्चात बोलताना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "त्यांना मत कोण देते? ते स्वतःच स्वतःची निवड करून घेतात. जनता त्यांना निवडून देत नाही. सध्याचे केंद्र सरकार, तसेच महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशातील सरकारे, ही सर्व मते चोरून सत्तेत आलेली सरकारे आहेत. आपल्याला या चोरांना सत्तेतून हटवायचे आहे. मोदी सत्तेतून गेले तरच लोकशाही टिकेल. लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला मोदींना सत्तेतून हटवावेच लागेल."
इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा पार पडला. या मोर्चात बोलताना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "ही एक ऐतिहासिक सभा आहे. आम्ही येथे 'मतचोरी'च्या विरोधात, विशेषतः अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून महिला, तरुण आणि दलितांची मते चोरण्याच्या प्रयत्नांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एकत्र आलो आहोत. जोपर्यंत ज्ञानेश कुमार पदावरून जात नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. ते भूमिगत झाले तरी आम्ही त्यांना शोधून बाहेर काढू. हीच आमच्या जनतेची, तरुणांची ताकद आहे."
तेजस्वी यादव यांची भाजपावर टीका
"रामलीला मैदान हे पारंपरिकरीत्या रामायण सादर करण्यासाठी ओळखलं जातं. परंतु आज आम्ही येथे अशा लोकांसाठी 'महाभारत' आयोजित केलं आहे जे मते चोरतात", अशी टीका आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केली.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपावर जोरदार टीका
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाविरुद्ध 'इंडिया' आघाडीच्या महा-रॅलीतील भाषणात बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
इंडिया आघाडीची दिल्लीत महारॅली; राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी रामलीला मैदानावर दाखल
‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चासाठी काँग्रेस नेते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले आहेत. या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी रामलीला मैदानावर दाखल झाले असून आता भव्य सभा पार पडणार आहे.
'इंडिया' आघाडीच्या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला
‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चासाठी काँग्रेस नेते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले आहेत. या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आहे.
"आम्हाला असा पक्षपाती 'पंच' नको"; खासदार शशी थरूर यांची ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका
‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चासाठी काँग्रेस नेते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, अभिषेक बॅनर्जी हे नेते रॅलीत सहभागी झाले आहेत. या महा रॅलीत सहभागी होत असताना खासदार शशी थरूर म्हणाले, "मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील लोकांचा विश्वास उडाला आहे. आम्हाला असा पक्षपाती 'पंच' नको आहे, जो मतदार यादीतून १३ कोटी (१३० दशलक्ष) लोकांची नावे काढून भारताचे राजकीय भविष्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही लोकांना मतदानाचा अधिकार दिलाच पाहिजे."
इंडिया आघाडीची दिल्लीत महारॅली; राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळेंसह आदी नेते रॅलीत सहभागी
निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चासाठी काँग्रेस नेते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, अभिषेक बॅनर्जी हे नेते रॅलीत सहभागी झाले आहेत.
राहुल गांधींसह 'इंडिया' आघाडीचे नेते रामलीला मैदानाकडे निघाले
‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या मोर्चासाठी काँग्रेस नेते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले आहेत. राहुल गांधी यांच्यासह 'इंडिया' आघाडीचे नेते रामलीला मैदानाकडे निघाले आहेत.
दिल्लीत इंडिया आघाडीची महारॅली, एक भव्य सभाही पार पडणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, खासदार फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, खासदार सुप्रिया सुळे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि इतर नेते रामलीला मैदानापर्यंत पदयात्रा काढत आहेत. रामलीला मैदानावर लवकरच एक भव्य सभा होणार आहे.
भाजपा दिल्लीतील व्यापाऱ्यांचं नुकसान करत आहे : राहुल गांधी यांचा आरोप
निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी खासदार राहुल गांधी म्हणाले, "आम्ही सर्वांना सांगितलं होतं की, जेव्हा तुम्ही या मोर्चासाठी आणि महा-रॅलीसाठी येथे याल, तेव्हा काहीतरी खरेदी करा, बाजार करा. परंतु, येथे कनॉट प्लेसच्या दिशेने येत असताना आम्हाला समजलं की, भाजपाने बळजबरीने सर्व दुकाने बंद पाडली आहेत. त्यामुळे, व्यापाऱ्यांचं नुकसान कोण करत आहे आणि ते कसं घडत आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवे."
“ज्ञानेश कुमारांच्या संदर्भात केंद्राने तातडीने निर्णय घ्यायची गरज होती”, शरद पवार यांचं वक्तव्य
मागील एक महिन्यापासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने आज १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ज्ञानेश कुमारांचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला सुनावलं आहे.
INDIA Bloc Rally Updates: निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चासाठी काँग्रेस नेते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, अभिषेक बॅनर्जी हे नेते रामलीला मैदानाकडे रॅलीसाठी जात आहेत. रामलीला मैदानावरून मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
दिल्लीत इंडिया आघाडीच्या महारॅलीला सुरूवात; राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, ममता बॅनर्जी, रामलीला मैदानाकडे रवाना
INDIA Bloc Ramlila Maidan Chalo Delhi Rally Updates: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चासाठी काँग्रेस नेते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, अभिषेक बॅनर्जी, केसी वेणुगोपाल हे नेते रामलीला मैदानाकडे रॅलीसाठी जात आहेत.
काँग्रेस नेते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले
INDIA Bloc Ramlila Maidan Chalo Delhi Rally Updates: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या मोर्चासाठी काँग्रेस नेते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावरील मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
"त्यांचे दिवस आता भरलेत", तेजस्वी यादव आक्रमक
रामलीला मैदानावर आयोजित 'इंडिया' आघाडीच्या रॅलीबाबत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, "आज एक भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. विविध पक्षांनी मिळून बनलेली आणि जनतेचा पूर्ण पाठिंबा असलेली 'इंडिया' आघाडी, भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एकत्र आली आहे. मतांची चोरी, लोकशाहीची पायमल्ली, प्रस्थापित व्यवस्था मोडीत काढणे आणि नागरिकांचे अधिकार हिरावून घेणे, या सर्वांविरुद्ध हे एक पाऊल आहे ज्ञानेश कुमार यांनी बजावलेल्या भूमिकेमुळे जनतेमध्ये तीव्र संताप आहे. त्यांना जाणीव आहे की एका घटनात्मक संस्थेत घटनात्मक पदावर बसून त्यांनी मतांच्या चोरीला मदत केली. त्यांचे खरे रूप आता समोर आले आहे आणि त्यांचे दिवस आता भरले आहेत. हे लोक भित्रे आहेत आणि जे लोक लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करतात, ते कधीही टिकत नाहीत. देशाला वाचवण्यासाठी, आपली लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपल्या देशाच्या राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत", असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
'असंख्य लोक या आंदोलनात सहभागी होतील'; काँग्रेस नेत्यांनी काय म्हटलं?
"आजचं आंदोलन ऐतिहासिक आहे. हे आंदोलन भारतीय निवडणूक आयोगाच्या आणि विशेषतः ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आहे. आज १४० कोटी नागरिक ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करत आहेत. पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक आहे. आज केवळ राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षच नव्हे, तर सर्व विरोधी पक्ष आणि देशभरातील नागरिक येथे जमलेले ८ लाख ते १० लाख लोक आणि आपापल्या घरून पाठिंबा देणारे असंख्य लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत", असं काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांनी इंडिया' आघाडीच्या महारॅलीवर भाष्य केलं.
"गृहमंत्री आणि संपूर्ण सरकार कशा प्रकारे भीतीखाली आहेत, हे आता तुम्ही पाहू शकता. वारंवार 'कलम १६३'चा उल्लेख करत विधाने केली जात आहेत. मात्र, नितीन नबीन जेव्हा रस्त्यावर उतरतात, तेव्हा हे 'कलम १६३' कधीच लागू केले जात नाही. पण आता आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'इंडिया' आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जेव्हा लोक बाहेर पडत आहेत, तेव्हा सरकार अस्वस्थ होत आहे. घाबरू नका. घाबरण्याचं काहीही कारण नाही. हा देशाचा आवाज आहे, तुम्हाला तो ऐकावाच लागेल", असं काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलं आहे.
'इंडिया' आघाडीच्या महारॅलीबाबत समाजवादी पक्षाच्या खासदारांनी कायम म्हटलं?
"तुम्ही संसदेत पाहिलं असेल की, आम्ही सर्वांनी मिळून मागणी केली होती की ज्ञानेश कुमार यांनी पदावरून पायउतार व्हावं. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पण त्यांना हे समजलेलं दिसत नाही. आमची ठाम भूमिका आणि प्रयत्न हेच आहेत की ज्ञानेश कुमार यांना हटवलं जावं आणि ज्या मतांना वगळण्यात आलं होतं, ती पुन्हा बहाल केली जावीत. अखिलेश यादव आणि इतर अनेक नेते यात सहभागी होत आहेत. खरं तर, आमच्या पक्षातील सर्वजण आणि संपूर्ण 'इंडिया' आघाडीचे नेते यात सहभागी होणार आहेत", असं समाजवादी पक्षाचे खासदार नारायण दास अहिरवार म्हणाले आहेत.

दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा लाईव्ह अपडेट्स
