scorecardresearch

Premium

जगातील बलाढय़ देशांत भारताचे स्थान अधोरेखित; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

भारतातील जागतिक वारसा स्थळांची वाढती संख्या आणि भारतीय संगीताबद्दल जगभरातील वाढती आस्था या विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधला. 

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ‘‘आफ्रिकेतील देशांच्या महासंघाचा ‘जी-२०’ राष्ट्रगटात सदस्य म्हणून समावेश आणि भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक मार्गिकेसंदर्भात झालेल्या निर्णयामुळे जगातील बलाढय़ देशांत भारताने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

 या प्रस्तावित आर्थिक मार्गिकेची तुलना मोदींनी भारताच्या इतिहासातील समृद्ध काळातील व्यापार-व्यवसायाचा मुख्य माध्यम असलेल्या रेशीम मार्गाशी (सिल्क रूट) केली. आगामी शेकडो वर्षे ही मार्गिका जागतिक व्यापाराचा मुख्य आधार बनेल आणि या मार्गिकेची सुरुवात भारतीय भूमीवर झाली यांची इतिहासात कायमची नोंद राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

israel at war
Israel at War: इस्रायलमधील भारतीयांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना; हमासच्या हल्ल्यानंतर पत्रक जारी!
India accounted for 20 per cent of global pre term births says Lancet study Premature baby rate increase in india
देशात प्रीमॅच्युअर बेबीजचं प्रमाण २० टक्के; लॅन्सेटच्या अहवालातून वास्तव उघड
Neelima_divi_loksatta
१ लाख कोटी रुपयांची उलाढाल करणारी कोण आहे ‘ही’ आहे भारतीय महिला… जाणून घ्या
khalistan movement still active in canada khalistan movement connection with canada
कॅनडा सदैवच खलिस्तानवाद्यांचे आश्रयस्थान!

हेही वाचा >>> “महिला कुस्तीपटूंचं शोषण करण्याची एकही संधी सिंह सोडत नव्हते”, दिल्ली पोलिसांचा न्यायालयात दावा

‘मन की बात’ या आकाशवाणीवरील आपल्या मासिक संवाद सत्रातील १०५ व्या भागात मोदी बोलत होते. त्यात मोदींनी चंद्रयान-३ आणि ‘जी-२०’चे यश, रोजगारनिर्मितीमध्ये पर्यटनाची भूमिका, भारतातील जागतिक वारसा स्थळांची वाढती संख्या आणि भारतीय संगीताबद्दल जगभरातील वाढती आस्था या विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधला.  त्यांनी  सण-उत्सव काळात स्थानिक   उत्पादने खरेदी करण्याच्या मंत्राची आठवण करून दिली.

देशाचा प्रत्येक भाग वंदे भारतने जोडणार : मोदी

नवी दिल्ली : ‘‘पायाभूत सुविधांच्या विकासाची सध्याची गती आणि प्रमाण १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी जुळणारे आहे. लवकरच देशाचा प्रत्येक भाग वंदे भारत रेल्वेगाडय़ांच्या सुविधेने जोडला जाईल. तो दिवस फार दूर नाही.’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी व्यक्त केला. 

मोदी यांनी  ११ राज्यांतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या नऊ ‘वंदे भारत’ रेल्वेगाडय़ांना दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारत एक्स्प्रेस उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा, आणि जामनगर-अहमदाबाददरम्यान धावतील.

‘जी-२० युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्रॅम’च्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), भारतीय व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (आयआयएम) सारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांतील विद्यार्थी यात सहभागी होतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे. या कार्यक्रमात भारताच्या आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टी असतील. या कार्यक्रमात मी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India among top nations says pm narendra modi mann ki baat zws

First published on: 25-09-2023 at 02:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×