…तर या देशात पुढच्या महिन्यात भारतीय आणि चिनी सैन्याचा एकत्रित युद्ध सराव

कावकाज-२०२० मध्ये पाकिस्तानी लष्करही सहभागी होऊ शकते…

चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती आता समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी हा दावा केला आहे.

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. चीन घुसखोरी केलेल्या काही भागातून मागे हटायला तयार नसल्यामुळे दोन्ही देशाचे सैनिक आमने-सामने आहेत. सीमेवर अशी परिस्थिती असली तरी पुढच्या महिन्यात रशियामध्ये होणाऱ्या युद्ध कवायतींमध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही देश आपले सैन्य पाठवू शकतात. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली.

लडाखमधील घुसखोरी केलेल्या भागातून चीनने पूर्णपणे माघार घ्यावी, यासाठी भारत-चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण अद्यापी कोंडी फुटलेली नाही. कावकाज-२०२० या युद्ध कवायतींमध्ये पाकिस्तानी लष्करही सहभागी होऊ शकते. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमधील सदस्य देशांसह एकूण अठरा देश या कवायतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

तटस्थ ठिकाणी बहुदेशीय कवायतींमध्ये सहभागी होणे भारत, चीन आणि पाकिस्तान तिघांसाठी सुद्धा नवीन नाहीय. लडाख सेक्टरमध्ये चीन बरोबर तणाव असल्यामुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या या युद्ध कवायती महत्त्वाच्या आहेत असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. रशियात १५ ते २६ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या कवायतींसाठी भारत तिन्ही सैन्य दलातून मिळून १५० ते २०० सैनिक पाठवणार आहे. चीन आणि पाकिस्तानकडून किती सैन्य सहभागी होणार ते समजू शकलेलं नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India and china may take part in war games in russia dmp

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या