भारतातील केंद्रीय औषध नियंत्रण विभागाने कोरोना विरोधी लस उत्पादक कंपनी सीरमला वयवर्षे ७ ते ११ वयोगटातील मुलांनाही लसीकरण चाचणीत सहभागी करून घेण्यासाठी परवानगी दिलीय. सध्या भारतातही लहान वयोगटातील मुलांनाही कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच ही लसीकरण चाचणीची परवानगी देण्यात आलीय.

केंद्रीय औषध नियंत्रण संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या (Central Drugs Standard Control Organization) तज्ज्ञांच्या समितीने म्हटलं, “सविस्तर चर्चेनंतर समितीने नियमांप्रमाणे वयवर्षे ७ ते ११ वयोगटातील कोरोना विरोधी लसीकरणाच्या चाचणीत सहभागी करुन घेण्याची परवानगी दिलीय.”

आधी १२ ते १७ वयोगटाला परवानगी, आता ७ ते ११ वयोगटाचाही समावेश

विशेष म्हणजे सीरमने याआधीच १२ ते १७ वयोगटातील मुलांच्या कोरोना विरोधी लसीकरण चाचणीला सुरुवात केलेली आहे. आता यात ७ ते ११ वयोगटाचाही समावेश झाल्यानं या वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सीरमने १२ ते १७ वयोगटातील लसीकरण चाचणीच्या १०० सहभागींचा अहवाल केंद्राच्या औषध विभागाला सादर केलाय. लवकरच यावर माहिती देण्यात येईल.

सध्या भारतात केवळ एकाच कोरोना लसीला लहान मुलांसाठी परवानगी

सध्या तरी भारतात केवळ झायडस कॅलिडिलाच्या डीएनएवर आधारीत कोरोना विरोधी लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळालीय. ही लस १२ वर्षांवरील मुलांना देता येते.

दिलासादायक वृत्त : ‘मॉडर्ना’चे सीईओ म्हणतात, “मला वाटतं वर्षभरामध्ये करोना…”