पीटीआय, नवी दिल्ली

२०३६च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) भविष्यातील यजमान ठरविणाऱ्या आयोगाला इरादा पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) सादर करण्यात आले आहे. भारतीय अधिकारी आणि ‘आयओसी’मध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनौपचारिक संवाद सुरू होता. अखेर भारताने यजमानपदाच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलले आहे.

llahabad High Court verdict on Madrasa Act quashed
‘मदरसा कायद्या’वर शिक्कामोर्तब, धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन नाही-सर्वोच्च न्यायालय; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah statement on Atal Bihari Vajpayee
वाजपेयींच्या मार्गानेच जायला हवे होते!
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 : कमला हॅरीस यांचा पराभव, रात्रीचं भाषणही रद्द!
us election polls
US Election Results : ‘अमेरिकेतील लोकशाही धोक्यात’, ७० टक्के मतदारांचे मत; एक्झिट पोलमधून काय कळते?
The Supreme Court ruling on taking over private property
खासगी मालमत्ता ताब्यात घेण्यावर अंकुश; सर्व भौतिक संसधाने समुदायांच्या मालकीची नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) १ ऑक्टोबर रोजी ‘आयओसी’ला पत्र पाठविल्याचे क्रीडामंत्रालयातील सूत्राकडून सांगण्यात आले. ‘भारतासाठी ही खूप मोठी संधी ठरू शकेल. आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि देशभरातील युवकांचे सक्षमीकरण यासाठी ऑलिम्पिक यजमानपदाचा फायदा होऊ शकेल,’’ असेही सूत्राने नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (पान ४ वर)(पान १ वरून) यांनी २०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या त्यांच्या सरकारच्या आकांक्षेबद्दल सर्वप्रथम गतवर्षी भाष्य केले होते. तसेच त्यांनी या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात ऑलिम्पिक आयोजनाच्या इच्छेचा पुनरुच्चार केला होता.

हेही वाचा >>>Sharda Sinha Passes Away : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पुढील वर्षी ‘आयओसी’च्या निवडणुका होणार असून त्यानंतरच यजमानपदाबाबत निर्णय घेतला जाईल. भारताने ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली असली, तरी सौदी अरेबिया, कतार आणि तुर्की या देशांचे आव्हान असणार आहे. इरादा पत्र सादर केल्यामुळे, भारताने ‘अनौपचारिक संवादा’पासून यजमान निवड प्रक्रियेच्या ‘निरंतर संवाद’ टप्प्यापर्यंत प्रगती केली आहे. या टप्प्यात, ‘आयओसी’कडून संभाव्य यजमान देशांतील खेळांशी संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा अभ्यास केला जातो. या प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात कोणत्या वर्षीच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवायचे आहे, त्यासाठी औपचारिक बोली सादर करणे आवश्यक असेल. याचे मूल्यमापन ‘आयओसी’च्या भविष्यातील यजमान ठरविणाऱ्या आयोगाद्वारे केले जाईल.

आयओसी’ अध्यक्षांचा पाठिंबा

ऑलिम्पिक यजमानपदाच्या भारताच्या प्रयत्नांना ‘आयओसी’चे विद्यामान अध्यक्ष थॉमस बाख यांचा पाठिंबा मिळाला आहे. मात्र, बाख यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षांची भारताप्रति काय भूमिका राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अहमदाबादला पसंती?

भारताला २०३६च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाल्यास ही स्पर्धा अहमदाबाद येथे आयोजित केली जाईल, अशी चर्चा आहे. भारताने यापूर्वी इतक्या भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन २०१० मध्ये केले होते. त्यावेळी नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच १९५१ आणि १९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धाही नवी दिल्ली येथे झाल्या होत्या.

Story img Loader