India China troops clashed near LAC in Arunachal: अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी गेल्या शुक्रवारी (९ डिसेंबर) झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसने या प्रकरणावर चर्चेची मागणी केली आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने या प्रकरणावर संसदेमधील चर्चेच्या माध्यमातून देशाला विश्वासात घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणावर आज म्हणजेच मंगळवारी संसदेमध्ये गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच विषयावर काँग्रेसने अनेक नेते संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये स्थगिती प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने असाही आरोप केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली प्रतिमा वाचवण्यासाठी देशाला धोक्यात टाकत आहे.

संसदेत उमटणार पडसाद

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटरवरुन या विषयावर भाष्य केलं आहे. “पुन्हा एकदा चिनी आणि भारतीय सैनिकांचा संघर्ष झाला. आपल्या सैनिकांनी शौर्याने याचा सामना केला. यामध्ये काही जवान जखमी झाले. आम्ही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एक देश म्हणून एकत्र आहोत. यावरुन कोणतेही राजकारण केलं जाणार नाही. मात्र मोदी सरकारला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक (एलएसी) चीनची घुसखोरी आणि एप्रिल २०२० पासून चीनच्या बाजूने सुरु असलेल्या बांधकामासंदर्भात स्पष्टपणे माहिती देणं गरजेचं आहे,” असं खर्गे यांनी म्हटलं आहे.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

“सरकारने या मुद्द्यावर संसदेमध्ये चर्चा करुन देशाला विश्वासात घेणं गरजेचं आहे. आम्ही आपल्या जवनांच्या शौर्यावर आणि बलिदानासाठी त्यांचे आभारी आहोत,” असं खर्गे म्हणाले आहेत.

…म्हणून मोदी सरकारने हे प्रकरण दाबलं

दुसरीकडे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी ट्विटरवरुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोप केलाय. “भारतीय लष्कराच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहे. सीमेवरील चीनच्या कारवाया पूर्णपणे चुकीच्या आहेत. मागील दोन वर्षांपासून आम्ही अनेकदा सरकारला यासंदर्भात जागं करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र मोदी सरकार केवळ आपली राजकीय प्रतिमा सुरक्षित ठेवण्यासाठी हे प्रकरण दाबण्याचं प्रयत्न करत आहे. त्यामुळे चीनच्या कुरापती वाढल्या आहेत,” असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

मोदींनी आपली प्रतिमा वाचवण्यासाठी देशालाच धोक्यात टाकलं

जयराम रमेश यांनी, “देशापेक्षा कोणीही फार मोठं नाही. मात्र मोदींनी आपली प्रतिमा वाचवण्यासाठी देशालाच धोक्यात टाकलं आहे,” असाही आरोप केलाय. उत्तर लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनने डेपसांगमध्ये एलएसीच्या सीमेपासून १५ ते १८ किलोमीटर आतपर्यंत २०० ठिकाणी तळ ठोकला आहे. मात्र सरकार यावर गप्प आहे. आता हे प्रकरण अधिक चिंताजनक झालं असल्याचंही जयराम रमेश म्हणालेत.

भारतीय जवानांची ६०० चिनी सैनिकांशी चकमक

‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलातील अधिकाऱ्याने दुजोरा दिला असला तरी त्याबाबतचा तपशील देण्यास मात्र त्याने नकार दिला. चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाले आहेत, असा दावा या अधिकाऱ्याने केला. चकमकीत काही भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. भारतीय जवानांची ६०० चिनी सैनिकांशी चकमक झाली, असे सूत्रांनी सांगितले.

गलवाननंतर पहिलाच संघर्ष

लडाखमधील गलवान खोऱ्यात अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतरची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद, तर अनेक जखमी झाले होते. अरुणाचल सीमेवर चिनी सैनिकांशी झालेल्या कथित चकमकीच्या घटनेला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे, मात्र तपशील देण्यास वा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. या संदर्भात लष्कराला प्रश्नावलीही पाठवण्यात आली होती, मात्र लष्कराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे वृत्तात म्हटले आहे.

चिनी सैनिकांना ताब्यात घेतलं

अरुणाचल प्रदेश सीमेवर चिनी सैनिकांशी संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सीमा निश्चित नसल्याने या भागात गस्त घालताना अनेकदा भारतीय जवान आणि चिनी सैनिक समोरासमोर येतात. अशीच एक घटना २०२१च्या ऑक्टोबरमध्ये घडली होती. चीनच्या मोठय़ा गस्ती पथकातील काही सैनिकांना भारतीय जवानांनी ताब्यात घेतले होते. तेव्हा त्यांच्यात यांगत्सेजवळ किरकोळ चकमक झाली होती.

अप्पर दिबांग खोऱ्यात चिनी सैनिकांवर पाळत

गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराने तवांग क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक (एलएसी) शस्त्रास्त्र सज्जता आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. उर्वरित अरुणाचल प्रदेशातही (आरएएलपी) अशाच प्रकारचा प्रयत्न सुरू आहे. रस्ते, पूल, बोगदे, निवास, साठवण सुविधा, हवाई वाहतूक सुविधा आणि दळणवळणाचे अद्ययावतीकरण आदी पायाभूत सुविधांबरोबरच अप्पर दिबांग खोऱ्यात चिनी सैनिकांवर पाळत ठेवणे यांचाही त्यात समावेश आहे.

नक्की वाचा >> अरुणाचलमध्ये भारत-चीन संघर्ष: “चीनला उत्तर देण्यास भारतीय लष्कर समर्थ, मात्र मोदींच्या कमकुवत…”; असदुद्दीन ओवेसी संतापले

चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ

चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमधील पूर्व लडाखमध्ये २०२०मध्ये झालेल्या चकमकीपूर्वी, चिनी तळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून खूप दूर होते. परंतु त्यानंतर मात्र चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ सरकण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांत चीनने पश्चिम क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पूर्व आणि मध्य क्षेत्रांमध्ये चीनच्या हालचाली वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी याआधी सांगितले होते. भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पश्चिम (लडाख), मध्य (हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड), सिक्कीम आणि पूर्व (अरुणाचल प्रदेश) क्षेत्रात विभागली गेली आहे.

जवानांवर गुवाहाटीत उपचार?

चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाल्याचा दावा एका लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. मात्र या चकमकीत भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर गुवाहाटीत उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चकमक झाली तेव्हा ६०० चिनी सैनिक होते, अशीही माहिती आहे.

गलवान नंतरची पहिलीच घटना

लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. गलवान चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्यात आतापर्यंत लष्करी पातळीवर द्विपक्षीय चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.

तवांग क्षेत्रातील सज्जता..

चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन तवांग सीमा क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक (एलएसी) शस्त्रास्त्र सज्जता आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर दळणवळणाच्या अद्ययावतीकरणासह अप्पर दिबांग खोऱ्यात चिनी सैनिकांवर पाळतही ठेवण्यात येते.