नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर भूमिकेमुळे भारत इतर देशांच्या तुलनेत करोनातून वेगाने बाहेर  येत आहे, असे मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले आहे.

अल्पसंख्याक कामकाज मंत्री असलेल्या नक्वी यांनी सांगितले, की मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने करोनाचा कणखरपणे मुकाबला केला असून त्यांनी केलेल्या कामाची चांगली फलश्रुती निर्माण झाली.  एकूण १५०० प्राणवायू प्रकल्प देशात पीएम केअर निधीतून बसवण्यात आले आहेत.

सहा प्राणवायू प्रकल्पांपैकी रॅडिको खेतानच्या प्राणवायू प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी सांगितले, की रामपूरमधील विलासपूर येथे हा प्रकल्प सुरू करण्यात येत असून एकूण सहा प्रकल्पांची क्षमता ताशी २० घनमीटर प्राणवायू निर्मितीची असणार आहे. रामपूरमधील बिलासपूर, कानपूरमधील बिलहौर, भगवंतपूर येथील प्रयागराज, महोबा, मांझानपूरमधील कौशंबी तर माणिकपूर मधील चित्रकूट येथे हे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.