कावेबाज चीन! भारतातील करोना संकट पाहता सीमेवर हालचालींना वेग

पूर्व लडाखमध्ये चीनी सैनिकांचा शिरकाव!

सौजन्य- Reuters

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्यामुळे देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. अशा परिस्थितीत अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्ससहीत अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. शेजारील चीनंही भारताला मदतीच्या हात पुढे केला आहे. मात्र चीनचा कावेबाजपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. चीनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारतीय सीमेत शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पूर्व लडाखमध्ये चीनी सेनेनं घुसखोरी केली आहे. त्याचबरोबर चीनी सैनिकांनी स्थायी निवास आणि डेपोची निर्मितीही केली आहे. त्यामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

“पुढच्या आठवड्यात भारतात सर्वोच्च रुग्णवाढ होण्याची शक्यता”, केंद्रीय तज्ज्ञांनी दिला इशारा!

या वर्षाच्या सुरुवातीलाच भारत आणि चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. चीननं मोठ्या संख्येनं सीमेवर सेना तैनात केली होती. तसेच भारतीय सीमेत शिरकावही केला होता. त्यामुळे भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना बंदीस्त केलं होतं. त्यानंतर दोन्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. मागच्या वर्षी मे महिन्यात भारत आणि चीनमध्ये सीमेवरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही देशाचे सैनिक भिडले होते. १५ जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला होता. त्यांना भारतीय सैनिकांनी जशाच तसं उत्तर दिलं होतं. या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीननं कित्येक महिने काहीच झालं नसल्याचा कांगावा केला. मात्र अखेर चीननंही आपले सैनिक मारले गेल्याचं जाहीर केलं. मात्र आकडा अद्यापही जाहीर केलेला नाही.

भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट! २४ तासांत ४ लाखांहून जास्त रुग्णसंख्या नोंदवणारा पहिला देश!

करोनाशी लढण्यासाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच ती मदत करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवून संवेदनाही व्यक्त केल्या. मात्र दुसरीकडे कावेबाज चीननं पुन्हा एकदा सीमेवर कुरापती सुरु केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India corona crisis china soldier movement on border rmt