ovid Cases in India, Maharashtra देशात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतचं जाताना दिसत आहे. करोना अटोक्यात येत असल्याचे वाटत असतानाच गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. परिणाणी देशात करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १३ हजार २१६ नवे करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात सक्रिय रुग्णांची संख्या ६८ हजारांवर पोहचली आहे. सध्या भारतात ६८ हजार १०८ करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत एकूण ४ कोटी २६ लाख ९० हजार ८४५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८. ६३ टक्क्यांवर पोहचले आहे. तर गेल्या २४ तासात ८ हजार १४८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित

महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या ३ दिवसांपासून ४ हजारापेक्षा अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ४ हजार १६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.