लख्वीच्या जामिनाला आव्हान

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याला जामीन मंजूर करताना दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११ खटल्यात देण्यात आलेल्या साक्षीकडे दुर्लक्ष केले असे स्पष्ट करून पाकिस्तान सरकारने शनिवारी लख्वीच्या जामिनाला आव्हान देणारी याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केली.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याला जामीन मंजूर करताना दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११ खटल्यात देण्यात आलेल्या साक्षीकडे दुर्लक्ष केले असे स्पष्ट करून पाकिस्तान सरकारने शनिवारी लख्वीच्या जामिनाला आव्हान देणारी याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केली.तथापि, न्यायालयाला ८ जानेवारीपर्यंत हिवाळ्याची सुट्टी असल्याने सरकारने याचिका दाखल कशी केली, असे विचारले असता सरकारी वकील चौधरी अझर यांनी सांगितले की, या याचिकेचे गांभीर्य लक्षात घ्यावे, अशी विनंती इस्लामाबाद उच्च न्यायालयास करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India created unnecessary hype over lakhvi bail pakistan