भारताचा विकास दरात २०२१ मध्ये ७.२ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु पुढील वर्षी आर्थिक वाढ मंदावेल. कारण करोना महामारीचा नकारात्मक परिणाम आणि खाद्यान्न महागाईचा खासगी वापरावर नकारात्मक परिणाम होईल. UNCTAD (United Nations Conference on Trade and Development) चा व्यापार आणि विकास अहवाल २०२१ बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक अर्थव्यवस्था २०२१ मध्ये मजबूत पुनर्प्राप्तीसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.

अहवालानुसार, २०२२ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ६.७ टक्के असेल, जो २०२१  साठी देशाच्या अपेक्षित विकास दरापेक्षा कमी आहे. परंतु ६.७ टक्क्यांचा मंद विकास दर असूनही भारताची पुढील वर्षी जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील. अहवालात म्हटले आहे की, “भारताने २०२० मध्ये विकास दर ७.० टक्के कमी झाल्याचा अनुभव घेतला. त्यानंतर देशाने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत १.९ टक्क्यांची मजबूत वाढ केली.”

अर्थव्यवस्थेने झेप घेतलीय की अर्थव्यवस्थेतील काही घटकांनी?; रघुराम राजन यांनी आकडेवारीसंदर्भात उपस्थित केला प्रश्न

जागतिक उत्पादन ५.३ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा

२०२० जागतीक विकास दर ३.५ टक्क्यांनी घसरल्यानंतर युनायटेड नेशन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट कॉन्फरन्सने यावर्षी जागतिक उत्पादन ५.३ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा केली आहे. यामुळे २०२० मध्ये झालेले नुकसान अंशतः वसूल होईल.