अंमली पदार्थांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान; म्हणाले…

अमित शाहांनी गांधीनगरमध्ये नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे उद्घाटन केले

India face narco terror biggest challenge Amit Shah information about the new terrorism
आज नार्को टेररचे आव्हान देशासमोर आहे असे अमित शाह यांनी म्हटले आहे ( फोटो PTI)

गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी देशाला अमली पदार्थांच्या दहशतवादाचा धोका असल्याचे म्हटले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ड्रग्स आणि सायकोट्रॉफिक सबस्टंट्स फॉर रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस ऑफ सेन्सर ऑफ एक्सलन्स फॉर एक्सप्रेसचे उद्घाटन करताना त्यांनी हे म्हटले आहे. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे उद्घाटन करताना अमित शाह म्हणाले की अमली पदार्थांच्या दहशतवादासोबत लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जेव्हा दुसर्‍या वेळी केंद्रात सरकार स्थापन झाले, तेव्हा हे केंद्र गुजरात फॉरेन्सिक विद्यापीठाला जोडले जाईल असा निर्णय घेण्यात आला असे अमित शाह म्हणाले.

मला खात्री आहे की हे विद्यापीठ अन्य राज्यातही विस्तारले जाईल आणि युवकांना फॉरेन्सिक सायन्ससाठी योगदान देण्याची संधी मिळेल. आम्ही सायबर डिफेन्स आणि बॅरिएट्रिक रिसर्चमध्ये स्वावलंबी होत आहोत. आज नार्को टेररचे आव्हान देशासमोर आहे. ‘भारताला आणखी एक धोका आहे. त्याचे नाव नार्को टेरर आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की आम्ही अंमली पदार्थांना देशात प्रवेश देऊ देणार नाही. आम्ही भारताला अमली पदार्थांचे ठिकाण होऊ देणार नाही. हे थांबविणे फार महत्वाचे आहे असे अमित शाह म्हणाले.

यासोबतच अमित शाह यांनी अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी वैज्ञानिक साधनांचा वापर करण्याची मागणी केली. अमित शहा म्हणाले की, आपल्याला गुन्हेगारी न्याय व्यवस्था उभारण्याची गरज आहे. फॉरेन्सिक सायन्स अशा कामात महत्वाची भूमिका बजावेल. कोणत्याही प्रकरणात तपासणी शक्य तितक्या वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असावी असे शाह म्हणाले.

करोना रोखण्याचा एकच मार्ग – १०० टक्के लसीकरण

“करोना लसीकरणाबाबत गुजरातमध्ये बर्‍याच समाजामध्ये शंका आहे. त्यांच्याकडे जाऊन आम्ही लस घेतली आहे हे सांगणे आमची जबाबदारी आहे, त्यांचा संकोच दूर करा. फक्त एकच गोष्ट आहे जी आपल्याला करोना संक्रमणापासून वाचवू शकते आणि ती म्हणजे १०० टक्के लसीकरण” असे अमित शाहांनी यावेळी म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India face narco terror biggest challenge amit shah information about the new terrorism abn

ताज्या बातम्या