केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच अनेक सरकारी प्रकल्प आणि योजनांमध्ये महात्मा गांधींच्या तत्त्वांचा समावेश केला आहे, असे म्हटले आहे. अमित शाह यांनी अहमदाबादच्या पालडी भागातील कोचरब आश्रमात एका कार्यक्रमाला संबोधित केले. महात्मा गांधींच्या मीठाच्या सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त दक्षिण गुजरातमधील दांडी येथे सायकल रॅलीच्या शुभारंभासाठी अमित शाह आले होते. या रॅलीअंतर्गत १२ सायकलस्वार दांडीयात्रा मार्गावरून जात असताना महात्मा गांधींचा संदेश देणार आहेत.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, यावेळी अमित शाह यांनी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबाबत भाष्य केले. “जर भारत सुरुवातीपासूनच गांधींनी दाखविलेल्या मार्गावर चालला असता, तर देशाला सध्या ज्या समस्या आहेत त्यांना तोंड द्यावे लागले नसते. समस्या ही आहे की आपण गांधींनी दाखवलेल्या मार्गापासून भरकटलो होतो. पंतप्रधान मोदींनी नव्या शैक्षणिक धोरणात गांधींच्या आदर्शांचा समावेश केला आहे. उदाहरणार्थ, मातृभाषा आणि राष्ट्रभाषांसोबत रोजगार शिक्षणाला महत्त्व देणे. पंतप्रधानांनी नवीन शैक्षणिक धोरणात सर्व गांधीवादी तत्त्वे अंतर्भूत केली आहेत,” असे अमित शाह म्हणाले.

Election Commission guidelines about Rahul Gandhi Abhishek Banerjee choppers searches
“राहुल गांधींचं हेलिकॉप्टर तपासता, मग मोदींचं का नाही?”, काय आहेत नियम…
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज
Dp Campaign by aap
अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आता ‘डीपी मोहिम’; आप नेत्या म्हणाल्या, “आज दुपारपासून…”

“भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशिवाय कोणत्याही देशाला सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळालेले नाही. लोकांमध्ये जागृती हेच आमचे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे ते म्हणाले होते. या जाणीवेमुळे भारतावर राज्य करणे कोणत्याही देशाला अशक्य झाले,” असे अमित शाह पुढे म्हणाले.

“मिठाच्या सत्याग्रहादरम्यान खेडोपाडी रात्रीच्या मुक्कामात गांधींनी सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या समस्या समजून घेतल्यानंतर त्यांनी त्यावर उपाय शोधून काढले आणि ते उपाय आपल्या भाषणातून लोकांपर्यंत पोहोचवले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनीही तेच केले. गावकऱ्यांच्या प्रगतीसाठी, गावांना स्वावलंबी बनवणे आणि प्रत्येक घरात वीज, पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे या सरकारी योजना पाहिल्या तर त्यात गांधीवादी विचार आणि आदर्शांची झलक दिसेल,” असे शाह म्हणाले.

दरम्यान, कोचरब आश्रम हा भारतातील महात्मा गांधींनी स्थापन केलेला पहिला आश्रम होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून १९१५ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात गेले. दहा वर्षांनंतर आश्रमाला भेट देत असल्याचे सांगताना शाह यांनी सायकल रॅलीतील सहभागींना त्यांच्या रात्रीच्या मुक्कामादरम्यान लोकांशी संवाद साधावा, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्यांच्यात गांधीवादी तत्त्वांबद्दल जागृती करावी, असे आवाहन केले.