India invokes the Essential Commodities Act, 1955 LPG Supply: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील इंधन, गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. घरगुती गॅसच्या रुपाने स्वयंपाकघरातही याची झळ पोहोचली आहे. दरम्यान, घरगुती गॅसचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी अत्यावश्यक वस्तू कायदा (EC कायदा) लागू केला आहे.

एस्मा कायदा

गेल्या ११ दिवसांपासून अमेरिका – इस्त्रायलने इराणविरोधात युद्ध छेडले आहे. यामुळे जगातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्रासह देशात याची घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकाराने देशात एस्मा कायदा (Essential Commodities Act, 1955) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यामुळे देशात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजारास आळा बसणार आहे.

काय आहे आदेश?

अधिकृत आदेशानुसार, केंद्र सरकारने रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिट्सना द्रव पेट्रोलियम गॅस (LPG) चे उत्पादन जास्तीत जास्त करण्याचे आणि प्रमुख हायड्रोकार्बन प्रवाह LPG पूलमध्ये वळवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, विशिष्ट क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्य वाटप म्हणून विचारात घेतला जाणार आहे.

मध्यपूर्वेतील संघर्षाचा फटका

अमेरिका – इस्त्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरु केल्याने आखाती देशातील अमेरिका आणि इस्त्रायलच्या लष्करी तळ तसेच इतर ठिकाणांवर इराणकडून हल्ले केले जात आहे. इराणकडून होर्मुज समुद्रधुनी देखील अद्याप सुरळीत न केल्याने जगात इंधन आणि नैसर्गिक गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. भारतात व्यावसायिक आणि घरगुती गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिक गॅससाठी रांगा लावताना दिसत आहेत. सरकारने एस्मा कायदा लागू केल्याने देशात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहणार आहे.