‘भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही’ असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केलेले आहे. महागाईविरोधात जयपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा राहुल गांधी बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल तसेच पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधीच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे. तर, काँग्रेस आपल्या भूमिकेत कसा बदल करत आहे याबाबत देखील चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण, ‘हिंदू’ या शब्दाची व्याप्ती वाढत असताना भारत हिंदूंचा असल्याचे राहुल गांधींचे हे पहिले समर्थन असू शकते. त्यांनी हिंदूंबद्दल आणखी काही विशेष टिप्पणी केल्या आहेत, ज्यात भारतात “हिंदूंचे राज्य” आणण्याबद्दलचा समावेश देखील आहे.

राहुल गांधी काय म्हणाले ?

“२०१४ पासून, हिंदुत्ववादी सत्तेत आहेत, हिंदू नाहीत. आपल्याला त्यांची हकालपट्टी करून हिंदूंचे राज्य आणण्याची गरज आहे.” तर, वर्षभरापेक्षा अधिक काळ चाललेले शेतकरी आंदोलन आणि मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल राहुल गांधी म्हणाले, जेव्हा हिंदू शेतकरी उभा होते, तेव्हा हिंदुत्वाद्यांनी म्हटले, ‘आय एम सॉरी’. तसेच, त्यांनी आपल्या हिंदुत्वावर पुन्हा जोर देत म्हटलं, “मी एक हिंदू आहे, मात्र हिंदुत्ववादी नाही. हे (सभेला जमलेल्यांकडे हात दाखवत) लोक देखील हिंदू आहेत, मात्र हिंदुत्वादी नाही.”

भारत हा हिंदूंचा देश, हिंदुत्ववाद्यांचा नाही!; राहुल गांधी यांचे वक्तव्य; जयपूरमध्ये शक्तिप्रदर्शन

तर, राहुल गांधी यांच्या या विधानावर काही प्रतिक्रिया येणं निश्चितच आहे. त्यानुसार ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमी(एआयएमआयएम)चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, जे मुस्लीम मतदरांना एकत्र आणण्यासाठी प्रचार करत आहेत, त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ओवेसींनी म्हटले की, “हिंदूंना सत्तेत आणणं २०२१ मध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ अजेंडा आहे, वा..” याचबरोबर, “भारत सर्व भारतीयांचा आहे. एकटे हिंदू नाहीत. भारत सर्व धर्मीयांचा आहे आणि त्या लोकांचा देखील ज्यांच्या कशावर विश्वास नाही.” असे देखील ओवेसींनी म्हटलेले आहे.

हिंदू विरुद्ध हिंदुत्व हे पहिल्यांदा नाही –

हे पहिल्यांदा नव्हते जेव्हा राहुल गांधी यांनी हिंदूंची तुलना हिंदुत्वाशी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका सत्रात बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, “हिंदू धर्माचे पालन करत असताना त्यांना हिंदुत्वाची गरज का आहे? शीख किंवा मुस्लीम व्यक्तीला मारहाण करणे हा हिंदू धर्म आहे का? नाही. पण हिंदुत्व आहे. हिंदुत्व अखलाकच्या हत्येबद्दल आहे?” तसेच, “तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला हिंदुत्वाची गरज का आहे? तुला या नवीन नावाची गरज का आहे?” असंही राहुल गांधी म्हणाले होते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं ते विधान –

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस आणि हिंदुत्वावर जोर देण्यास सुरूवात केली. निवडणुकीत तेच प्रभावी होते ज्याला विश्लेषकांनी मोदी लाट असं संबोधलं होतं. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष विभाजनाच्या दुसर्‍या बाजूला वळणे हे भूतकाळातील एक स्पष्ट निर्गमन आहे जेव्हा पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी अल्पसंख्याकांपर्यंत, विशेषतः मुस्लिमांपर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ९ डिसेंबर २००६ रोजी, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारचे नेतृत्व करत राष्ट्रीय विकास परिषदेच्या (एनडीसी) बैठकीत सांगितले होते की, “अल्पसंख्याकांना, विशेषत: मुस्लिम अल्पसंख्याकांना अधिकार मिळतील याची खात्री करण्यासाठी आपल्याला नाविन्यपूर्ण योजना तयार कराव्या लागतील. विकासाचे फायदे समान रीतीने वाटून घेण्याचे अधिकार मिळावेत. त्यांचा संसाधनांवर पहिला हक्क असला पाहिजे.”