India Israel friendship strengthened through pain of 26 11 Occult Israeli Officer ysh 95 | Loksatta

‘२६-११’च्या वेदनेतून भारत-इस्रायल मैत्रिबंध दृढ; इस्रायली अधिकाऱ्याचे मनोगत

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान भारतीय लोक आणि मुंबईकरांचे धैर्य दिसून आले.

‘२६-११’च्या वेदनेतून भारत-इस्रायल मैत्रिबंध दृढ; इस्रायली अधिकाऱ्याचे मनोगत
‘२६-११’च्या वेदनेतून भारत-इस्रायल मैत्रिबंध दृढ; इस्रायली अधिकाऱ्याचे मनोगत

पीटीआय, जेरुसलेम : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान भारतीय लोक आणि मुंबईकरांचे धैर्य दिसून आले. त्या दिवशी झालेल्या अतोनात हानीतूनच भारत आणि इस्रायल यांच्यात मजबूत मैत्रिबंध निर्माण झाला, असे शनिवारी इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

२६-११ च्या हल्ल्यातून निर्माण झालेली वेदना ही भारत आणि इस्रायल यांच्यातील वेदनेचा समान धागा असून त्याने उभय देश जोडले गेल्याची भावना अनेक इस्रायली नागरिकांनी व्यक्त केली आहे. इस्रायलच्या परराष्ट्र खात्याचे महासंचालक अलॉन उशपिझ यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, त्या भयानक दिवशी मी भारतीय लोक आणि मुंबईकरांचे धैर्य पाहिले, त्याचे मला आजही स्मरण होते. त्या दिवशी उभय देशांत निर्माण झालेल्या सहकार्याच्या बंधाचा आम्हाला अविरत लाभच होत आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी मुंबई हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक ठिकाणी सभा झाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:02 IST
Next Story
राज्यघटनेशी भाजपचा संबंध नाही : काँग्रेसचे टीकास्त्र