संशयित खातेदारांची माहिती देण्याबाबत भारत सरकारची स्वित्झर्लंडला विनंती

भारतीय सरकारने स्वीस बँकांमधील संशयित खात्यांचे तपशील मिळविण्यासाठी पुन्हा एकदा स्वित्झर्लंड सरकारला विनंती केली आहे.

भारतीय सरकारने स्वीस बँकांमधील संशयित खात्यांचे तपशील मिळविण्यासाठी पुन्हा एकदा स्वित्झर्लंड सरकारला विनंती केली आहे. सरकारने परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याची मोहिम तीव्र केली असून, त्यासाठी स्विस बँकांमधील भारतीय खातेदारांचे तपशील मिळविण्यासाठी भारतीय सरकार प्रयत्नशील आहे. काळ्या पैशाविरुद्धच्या या मोहिमेत आपण भारताला पूर्णपणे सहकार्य करू असे, आश्वासन यापूर्वीच स्वित्झर्लंडकडून देण्यात आले होते. त्यानंतर भारतीय अर्थमंत्रालयाकडून स्वित्झर्लंड सरकारला याबाबतचा तपशील देण्यासाठी विनंती करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India makes fresh request to switzerland seeking info on secret accounts